तिसऱ्या लाटेसाठी ची सज्जता गरजेची – आ. चंद्रकांतदादा पाटील

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप,९७६८४२५७५७,पुणे: क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुल माधव फाउंडेशन ने संभाव्य तिसऱ्या लाटेस समर्थपणे तोंड देण्यासाठी सुरु केलेले विविध उपक्रम स्तुत्य असून तिसरी लाट येऊच नये यासाठी आपण प्रार्थना करूयात, मात्र तिसऱ्या लाटेसाठी सज्जता ही महत्त्वाची असल्याचे आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. प्रभाग 13 एरंडवणे येथील प्रख्यात एस रुग्णालयात मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ह्या संकटकाळात अनेक डॉक्टर्स वा नर्सेसने आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून आपले कर्तव्य बजावले वा त्यामुळे कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला, मात्र नागरिकांनी आता जबाबदारी ने वागावे म्हणजे तिसरी लाट थोपवता येईल असेही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, एस हॉस्पिटल चे डॉ. सुरेश पाटणकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, ऍड. मिताली सावळेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे, राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर, ऍड प्राची बगाटे, जयश्री तलेसरा व अन्य मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या लाटेत रेमडिसिवीर वा ऑक्सिजन हे परवलीचे शब्द झाले होते त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या वेळी कोणास ही ऑक्सिजन अभावी अडचण येऊ नये यासाठी विविध ठिकाणी मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची व्यवस्था करत असून प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, निलेश गरुडकर व ऍड प्राची बगाटे ह्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे व्यवस्थापन करणार आहेत. कार्यक्रमासाठी विविध डॉक्टर वा नर्सेस उपस्थित होते. सागर पाटणकर यांनी स्वागत तर श्रीपाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here