सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड येथील ग्रामीण पोलीस स्टेशन च्या नवीन इमारत तसेच पोलीस स्टेशनच्या आवारात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या महिला विश्रांती कक्षाचे लोकार्पण महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक एम मल्लिकार्जुन प्रसन्ना , पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर,उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे आदिंची उपस्थिती.