अमरावती: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाला साजेसा आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त, डिवाईन आणि त्रैलोक्य इव्हेंट्स द्वारा आयोजित “वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या विशेष सौंदर्य स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ऐतिहासिक थीमवर आधारित ही स्पर्धा, मिस्टर, मिसेस, मिस आणि किड्स अशा विविध श्रेणींमध्ये होत असून, ऑडिशन ८ डिसेंबर २०२४ रोजी क्लब 27, तापाडिया मॉल, अमरावती येथे दुपारी ३ वाजता सुरू होऊन संध्याकाळी ८ वाजेपर्यंत होणार आहे.महाराष्ट्रात प्रथमच इतिहासिक थिम वर आधारित ही स्पर्धा फक्त सौंदर्याची चाचणी नसून, ती महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाचा अभिमान व्यक्त करण्याचा एक उपक्रम आहे. स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी निवडले जाणारे स्पर्धक १२ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल ग्रँड मेहफिल, अमरावती येथे अंतिम सादरीकरण करतील. आयोजक राधा ढेकेकर, सुराज कुटे आणि नम्रता गायकवाड यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले असून, स्पर्धकांना स्वत:ची प्रतिभा सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे.प्रसाद जेवडे, विक्रम येवतिकर, शीतल वलके, शुभांगी कावडे, स्नेहल सुने हे देखील इव्हेंटला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गतिशील आहे.ऑडिशनसाठी अमरावती व संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, ऐतिहासिक पोशाख, सादरीकरण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपली छाप पाडण्यासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला हा उपक्रम केवळ स्पर्धकांसाठीच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करणाऱ्या प्रत्येकासाठी खास ठरणार आहे.आयोजकांनी इच्छुक स्पर्धकांना या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, या ऐतिहासिक स्पर्धेचा एक भाग बनून आपले कौशल्य सादर करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
+91 7741873534
+91 7021264578
+91 7020660553