अमरावती: “वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या ऐतिहासिक थीमवरील विशेष सौंदर्य स्पर्धेचे भव्य ऑडिशन अमरावतीतील क्लब 27, तापाडिया मॉल येथे 8 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धेने अनेक स्पर्धकांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी एक सुवर्णसंधी दिली. दुपारी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या या ऑडिशनने संध्याकाळी 8 वाजेपर्यंत स्पर्धकांच्या आत्मविश्वासाने व आविष्कारांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.या ऑडिशनच्या यशस्वी आयोजनासाठी इव्हेंटचे आयोजक राधा ढेकेकर, सुराज कुटे आणि नम्रता गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली.सोबतच प्रसाद जेवडे, विक्रम येवतिकर, शीतल वलके, स्नेहल सुने, शुभांगी कावडे यांनी अथक परिश्रम घेतले. आयोजकांनी स्पर्धकांना प्रोत्साहन देत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.या स्पर्धेत मिस्टर, मिसेस, मिस आणि किड्स अशा चार श्रेणींमध्ये विविध वयोगटांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाने सादरीकरणातून आपली कौशल्ये आणि आत्मविश्वास दाखवून दिला. ऑडिशन्सचे परीक्षक सई जाधव, प्रियांका रणदिवे, डॉ. मिलिंद ढोके, डॉ. पंकजा इंगळे, अमृता ताजने, माधुरी धर्माळे, डॉ. शीतल चौधरी लाभले होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून निशी चौबे, विवेक पवार, तेजस्विनी पवार, वरून मालू, शीतल बावणे, इशांत देवरे, श्रद्धा अमृतकर, रवी वानखडे, अक्षय ढोके यांची उपस्थिती होती. नामांकित फोटोग्राफर्स अंकित पिंपळकर, प्रज्वल सातपुते, आकाश तिखीले यांनी या अविस्मरणीय क्षणांना टिपले. अतुल चव्हाण यांनी संचालनाची धुरा सांभाळली.परीक्षक मंडळ आणि उपस्थित पाहुण्यांनी सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.ग्रँड फिनालेसाठी तयारी सुरू असून १२ जानेवारी २०२५ रोजी हॉटेल ग्रँड मेहफिल, अमरावती येथे अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळणार आहे.“वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” या स्पर्धेच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि प्रतिभेला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, आणि या उपक्रमाला प्रेक्षकांकडून व स्पर्धकांकडून मिळालेला प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक ठरला आहे.
Home Breaking News “वीर वीरांगना महाराष्ट्र 2025” स्पर्धेचे भव्य ऑडिशन उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न