अहमदनगर (सुनिल नजन “चिफ ब्युरो” अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबा याञेनिमित्त बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.हातगावातील भक्त गण कार्तिक आमावस्येच्या अगोदर दोन दिवस जेजुरी येथे गेल्यावर कार्तिक आमावस्येच्या दिवशी जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन मशाल पेटवून ती थेट पायी हातगाव येथे चोवीस तासात दोनशे पन्नास किलोमीटर प्रवास करून आणली गेली.सदर मशाल ज्योतीची हातगावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.सदर मशाल ही खंडोबा मंदिरात आणून सलग पाच दिवस चंपाषष्टी पर्यंत तेवत ठेवून सर्व भक्त गण उपवास करतात. उपवासाच्या काळात मंदिरात भजन, कीर्तन, भारूड, धनगरी ओव्या,काकड आरती व खंडोबाची गाणी इत्यादी कार्यक्रम संपन्न झाले. चंपाषष्टीच्या दिवशी बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.गावातील खंडोबा भक्त श्रीधर काकडे,कडूबाळ देवढे, अविनाश गाडे,रावसाहेब घुले,विष्णू मातंग,मुरली भिसे,शिवाजी जऱ्हाड, अंकुश जऱ्हाड, गणेश मासुळे या कुटुंबाना या बारा बैलगाड्या ओढण्याचा मान देण्यात आला. या बारा गाड्यांवर अबाल व्रुद्ध सवार झाले होते. या बैलगाड्या खंडोबा मंदिरा जवळ आल्यावर देवाची पंचारती होऊन महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.राञभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.भल्या पहाटेच विस्तवावरून चालण्याचा रहाडयाञा कार्यक्रम झाल्यावर खंडोबा देवाचा लंगर तोडून काकड आरतीनंतर या सोहळ्याची सांगता झाली.जयमल्हार तरूण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी विषेश परीश्रम घेतल्यामुळे हा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संपुर्ण हातगाव पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी ही बैलगाड्या ओढण्याची याञा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.