कोरोना उपचारातील लुटीबाबत आवाज उठविल्याने ‘केपी न्यूज’ चॅनेलच्या संपादकांना डॉक्टराची धमकी

0

मुंबई : खोपोली (जि. रायगड) :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खोपोली शहरात शासकीय कोरोना सेंटर उभारण्यात न आल्याने काही डॉक्टरांना रूग्णांना लुटण्याचा परवानाच मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोना कमी व्हावा, यासाठी प्रयत्न करीत असताना आपली दुकाने चालावित…आपली तिजोरी भरत रहावी, यासाठी काही डॉक्टरांकडून कोरोना आजाराचा चांगलाच उपयोग करून घेण्यात आला आहे. रूग्ण कसे वाढतील, यावर भर देत हॉस्पिटल परिसरातील सुरक्षेचा बोजवारा उडविण्यात आला आहे आणि याबद्दल ‘केपी न्यूज चॅनेल’चे संपादक तथा स्वाभिमानी मिडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांना कोरोना सेंटर चालवून रूग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टराने तुम्ही आमच्या हॉस्पिटल विरोधात न्यूज लावल्याने भविष्य काळात तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागेल…तुमचा पेशंट बरा होवू द्या, मग तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी दिली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, केपी न्यूज चॅनेल नेहमी तत्ववादी पत्रकारिता करीत आले आहे. समाजावर किंवा कुठल्या वर्गावर अन्याय होत असेल तर त्याविरोधात केपी न्यूज चॅनेलचे संपादक फिरोज पिंजारी यांनी नेहमीच आवाज उठविला आहे. खोपोली नगर परिषद असो…विज वितरण कंपनी असो की, कामगारांवर अन्याय करणारे ठेकेदार…कोविड सेंटरच्या नावावर लुटणारे डॉक्टर असो की, ई-पास घोटाळा…केपी न्यूज चॅनेल नेहमीच जनतेच्या बाजूने आवाज उठवित आला आहे.खोपोली शहरात कोरोना सेंटर चालवून रूग्णांची लूट करणाऱ्या आणि उलट अल्पदरात उपचार करून रूग्णांवर उपकार करतो असा दावा करणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. याबाबत केपी न्यूज चॅनेलने आवाज उठविला होता. कोरोना संशयित रूग्णांना पॉझिटिव्ह रिपोर्ट येत नाही किंवा अॅडव्हॉन्स पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत कोविड सेंटरमध्ये दाखल न करता इतर आजारांच्या रूग्णांसोबत ठेवून इतर रूग्णांचा जीव धोक्यात घातला जात आहे. याबाबत केपी न्यूज चॅनेलने बातमी प्रकाशित केली होती. ही बातमी प्रकाशित झाल्याने रूग्णांवर उपकार करणाऱ्या रूग्णालयातील घोळ समोर आला होता. दरम्यान, ही बातमी प्रकाशित केल्याने या हॉस्पिटलमधील एका डॉक्टराने तुम्ही आमच्या हॉस्पिटल विरोधात न्यूज लावल्याने भविष्य काळात तुम्हाला मोठी किंमत चुकवावी लागेल…तुमचा पेशंट बरा होवू द्या, मग तुम्हाला पाहून घेवू अशी धमकी दिली. जनतेची लूट करणाऱ्या डॉक्टरांना नगरसेवकाचा पाठींबा :- कोरोना सेंटर चालवून रूग्णांची लूट करणाऱ्या डॉक्टरांना खोपोली शहरातील एका नगरसेवकाचा पाठींबा मिळत आहे. हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या गौडबंगालाची बातमी प्रकाशित झाली म्हणून घाबरून जावू नका, जर पत्रकार व चॅनेल मानले नाही तर खोपोली नगर परिषद, खालापूर तहसील प्रशासन, ऐवढेच नव्हे तर रायगड जिल्हा प्रशासनाला, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना देखील आपण ‘मॅनेज’ करू असा विश्वास या नगरसेवकाने डॉक्टरांना दिला आहे.एकदा खोपोली नगर परिषद प्रशासन, खालापूर तहसील प्रशासन, रायगड जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी व मंत्री ‘मॅनेज’ झाले तर हॉस्पिटलविरोधात कुणीही आकडतांडव घातला तरी हॉस्पिटलची चौकशी होणार नाही… हॉस्पिटलवर कारवाई होणार नाही, असा विश्वासही डॉक्टरांना दिल्याचे समजते. अद्याप कारवाई नाही, तर नगरसेकाचा ‘फंडा’ कामी आला का? :- अल्पदरात उपचार करतो म्हणजे रूग्णांवर उपकार करतो, असा दावा करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये रूग्णांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचे ‘केपी न्यूज’ने समोर आणल्यानंतरही हॉस्पिटलबाबत खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी… खालापुर तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी… कर्जत प्रातांधिकारी…रायगड जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली नाही. याचा अर्थ नगरसेवकाने आपला ‘फंडा’ यशस्वी करून दाखविला का? असा प्रश्न खोपोलीकरांना पडला आहे.”कोविड सेंटरच्या डॉक्टराने भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागण्याची धमकी दिल्याविषयी ‘केपी न्यूज’ चॅनेलचे संपादक तथा स्वाभिमानी मिडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्याशी बातचीत केली असता ते म्हणाले की, अल्पदरात उपचार करण्याचा दावा करणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टराने भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी दिली. ते म्हणाले की, खोपोली शहरातील यापूर्वी कोरोना सेंटरची तुम्ही चौकशी लावली होती व काही दिवसांपूर्वीच तहसिलदारांनी ज्यांना नोटीस पाठविली होती, ‘ते’ डॉक्टरही आमच्या सोबत असून लवकरच तुम्हाला तुमच्या कृत्याची शिक्षा मिळेल. खोपोलीतील काही डॉक्टर एकत्र येवून आपल्याला संपविण्याची भाषा करीत असल्याचे संपादक फिरोज पिंजारी यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले की, हे लोक मला संपवू शकतात, पण माझ्या विचारांनाही मी हाडांचा पत्रकार असून अन्यायाविरोधात मी लढतच राहीन, असेही त्यांनी ठासून सांगितले. काही स्थानिक नगरसेवक व डिपार्टमेंटमधील लोकांनाही हाताशी धरले जात असून या प्रकरणी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कोकण विभागीय अधिकारी व रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार केली जाईल, असे संपादक फिरोज पिंजारी यांनी सांगितले.”स्वाभिमानी मीडिया असोसिएशनकडून निषेध :- पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे स्वाभिमानी मीडिया असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांना कोविड सेंटरविरोधात बातमी प्रकाशित केल्याने एका डॉक्टराने भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणी स्वाभिमानी मीडिया असोसिएशनकडून डॉक्टर व त्यांना साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज पिंजारी यांना सुरक्षा देण्यात यावी, तसेच कोवीड सेंटरची चौकशी व्हावी, अशी मागणी स्वाभिमानी मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ऋषिकेश मुळे, राष्ट्रीय सरचिटणीस रविन्द्र गायकवाड, प्रदेश संयोजक डॉ. शरीफ शेख, उपाध्यक्ष पंकेश जाधव, पत्रकार शोएब म्यांनूर, अनिल पवार आदींनी केली आहे.( जगदीश का. काशिकर,कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here