वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.९१३००४००२४,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर) गटाची देवळा तालुका तसेच शहर कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली असून देवळा तालुकाध्यक्ष पदी अशोक गरुड,युवा तालुकाध्यक्ष पदी पवन गरुड,महासचिव पदी बापू गरुड यांची तर देवळा शहराध्यक्ष पदी विशाल पवार,शहर संपर्क प्रमुख पदी दया पवार,कार्याध्यक्ष पदी रमेश पवार,महासचिव पदी राजू जगताप,युवा शहराध्यक्ष पदी बॉबी पवार,उपाध्यक्ष पदी योगेश साळवे,तालुका युवा कार्याध्यक्ष पदी योगेश अहिरे यांची निवड करण्यात आली.नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिनेश अहिरे यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले.पक्ष बळकटीसाठी कायमसवरूपी प्रयत्नशील रहावे असे यावेळी अहिरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.