वृद्ध आईला मारहाण करणाऱ्या ह.भ.प. गजानन बुआ चिकनकर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी

0

मुंबई – सोशल मीडिया वर एक क्लिप फिरत होती कोणीतरी माळकरी बुआ घरात वृध्द आईला अमानुष रित्या मारहाण करीत आहे सदर व्हिडिओ ची दखल घेत युनिव्हर्सल ह्युमन राईट्स काऊन्सिल भारत च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.सुवर्णा ताई कदम व महाराष्ट्र संघटक मंत्री ओमकार खानविलकर* यांनी चौकशी केली असता हा इसम कल्याण ला राहतो असे समजले, सदर विषयाची माहिती UHRC च्या पूणा शहर अध्यक्षा सौ.पूजा पाटील व सांगली मीडिया प्रभारी सचिन मोहिते यांनीही संघटनेला कळवली होती, सदर इसम ह. भ. प. गजानन बुआ चिकनकर(द्वरली) हा लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या उक्ती प्रमाणे चार महिने चातुर्मास पळतो आणि जो विठुराया माता पित्यांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाने दिलेल्या विटेवर उभा राहिला त्या पंढरीत राहून लोकांना परमार्थाचे उपदेश करतो,ही माहिती मिळाल्यानंतर कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री.शहुराव साळवे साहेब यांना संपर्क करून या भंपक बुवा विरोधात तक्रार दाखल करून UHRC संघटनेच्या वतीने पत्र देऊन पोलीस हेडकॉन्स्टेबल महाडिक यांच्याकडे निवेदन दिले व कठोरत कठोर कार्यवाही करण्याची विनंती केली त्या प्रसंगी कल्याण तालुका अध्यक्ष सौ.सुनीता अडसुळे सदस्य, पिंकी गुप्ता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here