शिंपी समाजातील गरीब,गरजु महिलांना व कारागिरांना डोंबिवलीच्या नामदेव शिंपी समाज मंडळाकडुन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप.

0

डोंबिवली- सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कोरोना महामारीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समाज बांधवांना तसेच शिंपी काम करणा-या कारागिरांना व घर काम करणा-या महीलांना नुकताच डोंबिवलीत डी मार्ट मधुन घेतलेल्या जीवनावश्यक वस्तुंच्या ७०किटस् चे वाटत करण्यात आले. तसेच कोरोना झाल्यामुळे आर्थिक घडी विस्कटलेल्या समाज्यातील तीन जणांना आर्थिक सहाय्य करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मारुती हावळ हे उपस्थित होते. तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष भास्करराव चांडोले,गुरुनाथ माळवदे,माजी सचिव श्यामकांत धुरु,सचिव प्रमोद करमासे यांनी कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दील्या.या उपक्रमास प्रांझोगाफी स्टुडिओचे प्रणीत,रंगशाळाचे विनित पालव यांचे विशेष सहकार्य लाभले. नामदेव शिंपी समाज मंडळाच्यावतीने आयोजित या कार्यास देणगीदारांनी भरघोस मदत करुन कमिटीवर जो विश्वास दाखवला त्यामुळे हे पवित्र कार्य शक्य झाले,त्या सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. कमिटीच्या सर्व महिला व पुरुष सदस्यांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here