मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे संघटक सचिव आयु.सागरभाऊ साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त गुड शेफर्ड इंग्रजी विद्यालय, मनमाड, रेल्वे वर्कशॉप मधील मॅकिनिकल विभाग,आर.ए.विद्यान,श्रावस्ती नगर,आर.पी.एफ.कार्यालय, रेल्वे स्टेशन जवळ, ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन कार्यालय येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड,गुड शेफर्ड विद्यालय चे क्रीडा शिक्षक दिवाकर दोंदे सर, किरण जाधव सर, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुमित अहिरे, राहुल केदारे, देविदास नेरकर, अर्जुन बागुल,नवनाथ जाधव, अमोल लंकेश्वरी,नाना एंळीजे, बंटी घोडके, तुषार धिवर, हेमंत जाधव,निरज वेन्नलु,विकार अली, सतिश पाटील, सुभाष अहिरे आदी उपस्थित होते










