येवल्यात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त स्वारीप च्या वतीने अभिवादन.

0

नाशिक-:येवला शहरातील अहिल्याबाई होळकर घाट या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगतापव संतोष गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेजगात कोरोना प्रादुर्भाव असल्यामुळे त्या काळात थोर मोठ्या महापुरुषांच्या जयंती मोठ्या जल्लोषात साजऱ्या केली जात नसून राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती घरातच साजरी करण्याचे आव्हान शासनासह इतर सामाजिक संघटनेनेही केले त्या अनुषंगाने सोशल मीडियाच्या माध्यमातून राजमाता अहिल्याबाई होळकर जयंतीच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यात आल्या व मोजक्याच लोकांच्या उपस्थिती मध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर त्यांच्या भव्य पुतळ्यास जल्लोष न करता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी महिलांच्या प्रामुख्याने स्वतः कसोटीवर उतरून महिलांचे प्रश्न सोडवण्याचे काम त्यांनी केले पतीच्या निधनानंतर पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क असेल तसेच विधवा महिलेला दत्तक मूल घेणे, आंतरजातीय विवाह करणे, अशा अनेक एक निर्णय घेऊन ते अमलात आणण्याचे काम त्यांनी केले म्हणून 31 मे हा दिवस यांच्या जयंतीचा हा त्यांच्या कार्याचा गौरव करणारा दिवस असल्याने राजमाता अहिल्याबाई होळकर यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले यावेळी शशिकांत जगताप संतोष गायकवाड तुळशीराम जगताप उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here