ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे 31मे रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना चा सत्कार

0

मनमाड – ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे 31मे रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना चा सत्कार वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ करण्यात आला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, प्रविण भाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ भाऊ जोगदंड, वरिष्ठ कार्यकर्ते रविंद्रभाऊ पगारे आदी उपस्थित होते.
मनमाड वर्कशॉप मधून या महिन्यात एकूण 13कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे.कोरोणा काळात सेवानिवृत्त होत असल्याने कार्यक्रम साधास्वरूपात व कोरोणा चे सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम करण्यात आला. (१) धोंडीराम काकड,(२) संतोष माळी,(३) भगवान उबाळे,(४) रमेश रामचंद्र,(५) वाल्मिक राऊत,(६) अंबादास आहेर, (७)दशरथ लक्ष्मण, (८)हिरामण शंभर,(९)अरूण रामकृष्ण,(१०) काशिनाथ हरीभाऊ, (११)सुनिल रामचंद्र,(१२) शिवाजी रामभाऊ,(१३) रमेश शिपरू असे १३कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुत्रसंचलन शरद झोंबाड यांनी केले तर आभार प्रदर्शन सुभाष जगताप यांनी केले.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सिद्धार्थ जोगदंड यांची भाषणे झाली. झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी आपल्या भाषणात म्हणाले”आज हे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे म्हणजे फक्त कर्मचारी सेवानिवृत्त होत नाही त्यांच्या बरोबर अनुभव सुद्धा सेवानिवृत्त होत असते, तरूण कर्मचाऱ्यांनी त्यांचा अनुभव चा आदर्श घेऊन हा कारखाना अजून १००वर्ष कसा चालेल त्यासाठी प्रयत्न करावा” कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे आति.सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, संदिप धिवर,दिपक अस्वले विनोद खरे, किरण आहीरे, नवनाथ जगताप, संदिप पगारे,अनिल भोसले,सचिन इंगळे, प्रभाकर निकम, अर्जुन बागुल, प्रशांत मोरे, बलराम सिंह, विशाल कराड, गणेश केदारे,गणपत गायकवाड आदी ने केले.
कार्यक्रमाच्या शेवटी कोरोणामुळे मृत्यूमुखी झालेल्या वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here