१९८८ सालातील शिरोडकर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा.

0

प्रतिनिधी-परेल-मुंबई : सध्या कोविड सारख्या महामारीने अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपुर्ण देशाला ग्रासले आहे. कोरोनाच्या यां पार्श्वभूमीवर जरी एकत्र भेट होत नसली तरी व्हाटसप, फेसबुक, इन्स्टा.., ट्विटर या सोशल मिडिया च्या द्वारे मित्र मैत्रिणी एकत्र भेटत असतात आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. अशीच एक १९८८ सालातील परेल, मुंबई येथील प्रख्यात शिरोडकर शाळेच्या माजी विद्यार्थ्याँची ऑनलाईन झूम सभा (व्हटसप समूहाच्या ५ व्या वर्धापनदिनचे औचित्य साधून) नुकतीच संपन्न झाली. सभेच्या सुरवातीला शिरोडकर शाळेचे सांस्कृतिक शिक्षक लेखक-दिग्दर्शक-निर्माता कै.ज्योतीराम कदम सर, कै.पोरे सर, कै.नाबर सर, कै.शिरोडकर सर, कै.गावडे शिक्षिका यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहिली. ॐकार स्वरूपा या श्री गणेश स्तवनाने महेश्वर तेटांबे यांनी सभेची सुरुवात केली. या ऑनलाईन सभेत प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका दिपाली विचारे, प्रसिद्ध अभिनेता संजय खापरे, दिग्दर्शक – पत्रकार महेश्वर तेटांबे, डॉ. प्रतिभा गायकवाड, स्वप्ना साळवी, राजेश मुणगेकर, संतोष, निलेश परळकर, सचिन पाटणकर, सोनल सावंत, विवेक कौर, तुषार वंजारे, विनोद तावडे (एस पी), अरुण जाधव, सीमा तोसकर, दिगंबर महाडेश्वर, स्वाती दळी, सोनल सावंत, शुभांगी अड्रेकर, तृप्ती डिसोझा, डॉ. संतोष यादव, संगीता माने, दत्तात्रय थोरात, प्रविणा निमकर, अँड.सुनिल मालवणकर, सुनिल कडू, देवेंद्र पेडणेकर, श्रीकांत आयरे, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड क्लब संस्थापक राजेश विनायक कदम, आदी सर्व शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील गोड अनुभव शेअर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. नेत्रा पाष्टे यांच्या श्रवणीय अशा काव्यमय रचनेमुळे ऑनलाईन सभेला रंगत आणली तर संजय तुरंबेकर यांच्या तू मेरी जिंदगी हैं आणि श्रीकांत आयरे यांच्या यारी हैं इमान मेरा यार मेरी जिंदगी या गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. दिपाली विचारे, संजय खापरे, सुनिल कडू, सुनिल मालवणकर, देवेंद्र पेडणेकर,अरुण जाधव, श्रीकांत आयरे या सर्वांनी आपले जुने अनुभव कथन करून सभेत जान आणली. जिच्या अतोनात परिश्रमांमुळे सर्व माजी विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि केवळ त्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनामुळे १० वरून ८५ माजी विद्यार्थ्याँचा समूह तयार झाला असे आमचे व्हटसप समूह अड्मिन डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी आपल्या मधाळ वाणीने संपुर्ण ऑनलाईन सभेचे सूत्र संचालन करून आपली कार्यतत्परता बजावून ऑनलाईन सभेत वाहवा मिळवली त्याचबरोबर डॉ. प्रतिभा यांनी उपस्थित माजी विद्यार्थाँचे आभार मानले. अशा तऱ्हेने १९८८ सालातील शिरोडकर शाळेच्या माजी विद्यार्थ्याँची ही ऑनलाईन सभा (५ वा वर्धापनदिन) सभा आनंदी वातावरणात संपन्न झाली.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,दिग्दर्शक-पत्रकार,९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here