सिरसाळा येथील कोविड सेंटरला उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी दिली भेट

0

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्राम पंचायत यांच्या वतिने सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर ला पंचायत समितीचे उपसभापती जनिमियाँ कुरेशी यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित आरोग्य कर्मचारी व रूग्णांशी संवाद साधून विचारपूस केली. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. ना. मुंडेंच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्राम पंचायत यांच्या वतिने सिरसाळा येथे 50 बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला रविवार दि.23 मे रोजी पंचायत समितीचे उपसभापती जानिमियाँ कुरेशी यांनी सदिच्छा भेट दिली. या कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित रूग्णानवर उपचार करण्यात येत आहेत. सिरसाळा परिसरातील रूग्णांना हे कोविड सेंटर आधार बनले आहे. धनंजय मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून उभारलेले कोविड सेंटर सिरसाळा येथे झाल्यामुळे रूग्णांना वरदान ठरत आहे. या ठिकाणी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांची घेतली जाणारी काळजी, तसेच डॉक्टर, नर्स, स्टाफ यांचे असणारे योगदान यांचे त्यांनी कौतुक केलं. अशा विविध गोष्टी संदर्भात त्यांनी माहिती घेतली. यावेळी डॉ. शेख व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here