नाशिक जिल्हा शाखेचा स्तुत्य उपक्रम

0

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७,नाशिक : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने पाथरी विभागातील गरीब व गरजू कुटुंबाना एक महिना पुरेल इतके अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. सदर उपक्रम प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नवनाथ गायकर, नाशिक जिल्हाध्यक्ष नंदू पगार, जिल्हा संघटक आर.डी.भोये यांच्या सहकार्याने संघाचे पदाधिकारी गणेश कंकाळ, चंद्रकांत सांगळे, किशोर आठवे, राधा कंकाळ, मनिषा कांबळे यांच्या माध्यमातून पाथर्डी परिसरातील कुटुंबाना एक महिना पुरेल इतके गहू, तांदूळ, गोडतेल, साखर, चहापत्ती, कांदे, बटाटे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोना, संचारबंदी व लाॅकडाऊनमुळे ज्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्या कुटुंबाना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मदतीचाहात पुढे करीत आहे.महाराष्ट्रातील सतत सामाजिक उपक्रमशील कार्य करणारी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अनेकविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, कोविड योद्ध्यांचा सन्मान असो, फूटपाथवर राहणाऱ्या गरिबांना अन्नछत्र देणे, पत्रकार, डॉक्टर, नर्स यांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून देणे, आदिवासी भागात शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे असे अनेकविध सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणा-या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा जनसामान्यांतून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात अनेक तालुक्यात या संघाचे पदाधिकारी व सदस्य विस्तारलेले असून सतत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.
या उपक्रमशील कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य, विभागीय, जिल्हा, सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व सभासद यांनी नाशिक जिल्हा शाखेचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here