परिचारिका करिअर म्हणजे यशाचा मार्ग : या क्षेत्रातील करिअर विषयी माहिती जाणून घ्या.

0

मुंबई – जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७● आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेकजन या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छित असणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. जाणून घ्या यात करिअर कसे घडवावे.🩺 *नर्सिंग कोर्स केल्यावर कामाच्या संधी*🔅 *सर्जिकल नर्स :* सर्जिकल नर्सेचे काम असते सर्जरीच्या आधी आणि सर्जरीच्या नन्तर रुग्णाची काळजी घेणे. सर्जिकल नर्स सर्जरीच्या वेळेस पण डॉक्टरला मदत करते.🔅 *ICU नर्स :* ICU नर्स रुग्णाचे ICU मध्ये काळजी घेते. शक्यतो अकॅसिडेंट केसेस आणि काही गंबीर आजारांच्या रुग्णांची ICU नर्स काळजी घेतात.🔅 *स्कूल नर्स :* स्कूल नर्सेस शाळेत काम करतात. शाळेतल्या मुलांची काळजी घेणे हि त्यांची मुख्य जवाबदारी असते.🔅 *Emergency नर्स :* Emergency नर्स दवाखान्यातल्या एमेरगेंचय रूम मधल्या केसची काळजी घेतात.🔅 *Psychiatric नर्स :* Psychiatric नर्स Psychiatric दवाखान्यात काम करतात.🔅 *पेडिऍट्रिक नर्स :* पेडिऍट्रिक नर्स पेडिऍट्रिक दवाखान्यात काम करतात.🔅 *लेबर – डिलिव्हरी नर्स :* लेबर – डिलिव्हरी नर्स स्त्रियांना लेबर आणि डिलिव्हरीच्या वेळेस मदत करतात.🖊️ *बारावी नंतर करावयाचे नर्सिंग कोर्सेस :*▪️ *बी. एस्सी. नर्सिंग (बेसिक)* – 10 + 2 सायन्स दरम्यान, विद्यार्थ्यांनी Physics, Chemistry, Biology व English विषय घेणे आवश्यक आहे. हा कोर्से 4 वर्षात पूर्ण होतो.▪️ *GNM नर्सिंग* – GNM नर्सिंग कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांनी Science किंवा Arts विषयात त्यांचे 10 + 2 केले पाहिजे. हा कोर्से 3 वर्षात पूर्ण होतो.▪️ *ANM नर्सिंग* – रेगुलर मध्ये केला तर हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो, डिस्टन्स लर्निंग ने केला तर कोर्सला ३ वर्ष लागतात.🎓 *पदवीनंतर करावयाचे नर्सिंग कोर्सेस*▪️ *बी. एस्सी. (पोस्ट बेसिक)* – ह्या कोर्सेला Admission घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचे १०+२ Science किंवा Arts मध्ये करणे गरजेचे आहे. याबरोबर GNM पूर्ण असणे आवश्यक आहे. हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.▪️ *M.Sc नर्सिंग* – M.Sc नर्सिंग पूर्ण करण्यासाठी तुम्ही बी. एस्सी. नर्सिंग / पोस्ट सर्टिफिकेट बी. एस्सी./ Post Basic बी. एस्सी. मान्यता प्राप्त संस्थेतून पूर्ण केले असावे आणि एकूण aggregate 55% असावे. आपणास बी.एस्सी नंतर एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. हा कोर्से २ वर्षात पूर्ण होतो.▪️ *M.Phil नर्सिंग* – आपण INC ने मान्यता दिलेल्या संस्थेतून नर्सिंग (कोणतीही स्पेसिलीटी) मध्ये 60% अग्ग्रेगते सह पूर्ण केले पाहिजे. फुल्ल टाइम मध्ये हा कोर्से १ वर्ष पूर्ण होतो. पार्ट टाइम मध्ये हा कोर्से पूर्ण होण्यासाठी २ वर्ष लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here