देवपुरपाडें येथील जि. प. मराठी प्राथमिक शाळेत लसीकरणाला सुरवात

0

वासोळ:  प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो. ९१३००४००२४,ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे . या लसीकरण केंद्राचे उद्घाटन उपसरपंच शिवाजी अहिरे व अजय अहिरे,आणि वासोळ आरोग्य उपकेंद्र आरोग्य सेवक डॉ.महेश सुर्यवंशी ,तसेच आरोग्य सेविका वंदना बच्छाव, व आशा सेविका यांच्याहस्ते आज बुधवारदि. २८ एप्रिल रोजी करण्यात आले.
देवपुरपाढे येथे लसीकरण केंद्र नसल्याने मेंशी व लोहणेर येथील आरोग्य केंद्रात लसीकरणाला जाण्यासाठी जेष्ठ नागरिकांना (४५ वर्षा पुढील)मोठी समस्या निर्माण झाली होती त्यामुळे जेष्ठ नागरिकांसह(४५ वर्षे पुढील) अभिमन (बापू) अहिरे यांनी देवपुरपाडें येथे लसीकरण केंद्र चालू करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करुण देवपुरपाडें येथे कोविशील्ड लस उपलब्ध केली.सध्या परिसरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. त्यामुळे आता या लसीने थोडे समाधान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. देवपुरपाडें व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी(४५वर्ष पुढील) लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी वासोळ आरोग्य सेवक डॉ. महेश सुर्यवंशी यांनी केले आहे. देवपुरपाडें येथील लसीकरण केंद्रात ज्येष्ठ नागरिक उपसरपंच शिवाजी अहिरे यांनी प्रथम लसीचा लाभ घेतला आहे. यावेळी देवपुरपाडें सरपंच अनिता सोनवणे उपसरपंच शिवाजी अहिरे,सदस्य अजय अहिरे, व आरोग्य सेवक महेश सुर्यवंशी , आरोग्य सेविका वंदना बच्छाव, व आशा सेविका आदि ग्रामस्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here