ब्रेक दि चेन “

0

औरंगाबाद – कोविड -१ ९ संसर्गाच्या वाढत्या प्रादुभार्वास प्रतिबंध होण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण जिल्हात शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या “ ब्रेक दि चेन ” या प्रतिबंधात्क उपाय योजनेची तसेच संचारबंदी / जमावबंदी आदेशाची १०० टक्के अंमलबजावणी करण्यात येत आहे . औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील ग्रामीण भागात कोविड -१ ९ संसर्गाला रोखण्याचे अनुषंगाने मा.मोक्षदा पाटील , पोलीस अधीक्षक यांनी काल सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना लॉकडाऊन अंमलबजावणीच्या दृष्टीने कोणाचीही गय न करता तात्काळ धडक कायदेशिर कारवाई करण्याच्या सक्त सुचना दिल्या आहेत . तसेच व्हिडीओ संदशेद्वारे नागरिकांना आवाहन करून सध्याच्या परिस्थीतीत कोणीही विनाकारण घरा बाहेर न पडण्याची सुचना केली आहे . तसेच भाजीपाला , फळ विक्रते यांनी अरुंद जागेत दुकान लावल्यास त्या ठिकाणी नागरिकांची खरेदी करिता गर्दी होवुन कोंडी निर्माण होते हे टाळण्यासाठी ही सर्व दुकाने स्थानिक प्रशासनाचे साहय्याने तात्पुरत्या स्वरूपात मोठया व मोकळया जागेत स्थलांतरीत करण्याचे निर्देश दिले होते . या अनुषंगाने पाचोड येथील बसस्थानक शेजारील रस्त्यावर असलेल्या अरुंद जागेत असलेला भाजी व फळे तसेच इतर अत्यावश्यक वस्तुचे विक्रते यांची पाचोड पो.स्टे . चे सपोनि श्री गणेश सुरवसे यांनी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक , ग्रामपंचायत सदस्य याचे सहयोगाने बैठक घेवुन रस्त्यावर विक्री करिता बसणा – या भाजीपाला व फळविक्रेत्यांना कोविड -१ ९ च्या बाबत खबरदारीचे उपाय समजावून सांगुन त्यांना ग्रामपंचायतीच्या मार्फतीने तात्पुरत्या स्वरूपात मोठया मैदानावर मार्किंग करून देवुन स्थलांतरित करण्यात आले आहे . ज्यामुळे येथे नागरिकांची कोंडी तसेच गर्दी होणार नाही ज्यामुळे कोविड -१ ९ संसर्गास प्रतिबंध बसेल , याचप्रमाणे मा . पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व अत्यावश्यक श्रेणीतील व्यवसायीक ( व्यापारी ) यांनी त्यांची दुकाने ही फक्त दुपारी १२ वाजेपर्यंतच चालु ठेवण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे . यामध्ये स्थानिक भाजीपाल व फळ विक्रेते यांनी सध्दा आवर्जून त्यांचा सहभाग नोंदविला आहे . यासह विनाकारण घराबाहेर पडुन दुचाकी वाहनाद्वारे रस्त्यावर फिरून संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा – या विरुध्द पाचोड पोलीसांनी रस्त्यावरच त्यांची कोविड -१ ९ ची अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली यामध्ये ७० जणांची चाचणी करण्यात आली असुन यामध्ये ०४ जण कोविड -१ ९ पॉझिटिव्ह मिळून आले आहे , रस्त्यावर होत असलेल्या कोविड -१ ९ टेस्टची माहिती मिळताच विनाकारण बाहेर फिरणा – याच्या गर्दीस तात्काळ आळा बसला . याच प्रमाणे जिल्हयातील इतर पोलीस ठाणे अंतर्गत सुध्दा विनाकारण रोडवर फिरणा – या व्यक्तींची जागेवरच अँटीजन टेस्ट करण्यास सुरूवात करण्यात आली आहे . मा.पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत कोविड -१ ९ संसर्गाबाबत व्यापक जनजागृती करिता पोलीस पेट्रोलिंग व्हॅनच्या पी.ए. सिस्टमवरून खबरदारीचे उपाय योजना बाबत तसेच मास्क चा वापरासह सोशल डिस्टन्सिग ठेवणे बाबत नागरिकांना वारंवार आवाहन करण्यात येत आहे . तसेच लॉकडाऊन संदर्भात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणाकडुनहीं उल्लंघन होत असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष , औरंगाबाद ग्रामीण येथील ०२४०-२३८१६३३ , २३ ९ २१७१ या क्रमांकावर माहिती द्यावी . नागरिकांनी संचारबंदी / जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून नये , अशा व्यक्तींच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येवुन तात्काळ कलम १८८ भादवी प्रमाणे व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००७ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात येईल,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here