अहमदनगर (सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाडळी ता.पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथील न्यु इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विनायक कचरे सर यांचा ३३वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतरचा सेवापुर्ती गौरव सोहळा ढवळेवाडी येथील शिवराज मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे युवा नेते कुशल भापसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कराळे, पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते, पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाषराव बर्डे, व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ हे होते.प्रारंभी सरस्वती व हुतात्मा बाबू गेणू संस्थेचे संस्थापक माजी आमदार स्व.बाबुराव भापसे,स्व.प्रमोद भापसे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.नंतर वाई सातारा येथे प्रांताधिकारी या पदावर कार्यरत असलेले राजेंद्र कचरे साहेब यांनी प्रास्ताविकात कचरे सरांच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना त्यांचा सारा जिवनपटच सादर केला.आणि सर्व प्रथम कचरे परीवाराच्या वतीने विनायक कचरे सरांचा सपत्नीक जाहीर सत्कार केला.पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब,पाडळीचे नेते अशोक गर्जे,माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,अण्णा आमटे सर,उद्धवराव वाघ, ज्ञानेश्वर माउली कराळे, कुशल भापसे, अजिंक्य भोरडे सर, यांनी आपल्या भाषणात सत्कार मुर्ती कचरे सर यांच्या विषयीचे गौरवोद्गार काढले. शेवटी नाना गायकवाड यांनी आभार मानले.या सेवापुर्ती गौरव सोहळ्यासाठी रामकिसन काकडे, सुभाष ताठे, कुंडलीक आव्हाड,बबन भिसे महाराज,शेषराव कचरे, विष्णूदास भोरडे,भवार साहेब, दत्तात्रय म्हस्के, मुरलीधर भगत, भाऊसाहेब शेळके दुकानदार,चौधरी मॅडम, मुख्याध्यापक नंदकुमार लोखंडे सर यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी कचरे परीवाराच्या वतीने स्व.द्वारकाबाई सुर्यभान कचरे,आणि स्व.सुर्यभान कचरे यांच्या स्मरणार्थ पाडळी येथील न्यु इंग्लिश स्कूलच्या वाल कंपाऊंडच्या भींतीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली.उपस्थितांना प्रिती भोजन देऊन या सोहळ्याची सांगता झाली.