राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखा च्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाड वर्कशॉपमध्ये टाईमबुथ जवळ साजरी करण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
३१मे रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
राजेश मुखोपाध्याय, वाल्मिक केदारे, भास्कर सोमासे,मोहन अहिरे, भाऊसाहेब केदारे, दत्तात्रय शिंदे,रायभान कांडेकर, कांतीलाल कातकडे,खंडू कन्नोर,पोपट निकम, साहेबराव बागुल, ज्योती पाटील आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सिनियर सेक्शन इंजिनिअर आयुब शेख, कारखाना शाखेचे सचिव प्रविण अहिरे, कारखाना शाखेचे कार्याध्यक्ष किरण अहिरे, कारखाना शाखेचे खजिनदार संदिप धिवर, कारखाना शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील तगारे, कारखाना शाखेचे अतिरिक्त सचिव सागर गरूड, कारखाना शाखेचे उपाध्यक्ष संदिप पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कारखाना शाखेचे अध्यक्ष हर्षद सुर्यवंशी, ज्युनिअर इंजिनिअर सागर साळवे,ओ बी सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे सचिव शशिकांत आढोकार, खजिनदार वेरेद्र यादव, एन.आर.एम.यु.कारखाना शाखेचे सचिव रमेश केदारे, उपाध्यक्ष विनोद जोडपे, आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सचिन इंगळे, चंद्रशेखर दखने,राजू अतनोर, शशिकांत आढोकार आदि चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष शिलावट यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले
कार्यक्रमाचे आयोजन संदिप पगारे, अभ्युदय बागुल, फकिरा सोनवणे, सुनील सोनवणे, गणेश केदारे, अनिल अहिरे, रमेश पगारे, विलास कराड, विशाल त्रिभुवन, प्रशांत निकम, नदीम सैय्यद गणपत गायकवाड राहुल शिंदे, सुमित अहिरे विशाल घोडके, सुधीर आडकमोल,अर्जुन बागुल आदि ने केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here