वृक्षारोपण केले व नंतर लग्न विधी सोहळा संपन्न झाला

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेचे संघटन सचिव, निसर्गमित्र व रेल्वे वर्कशॉपमधील ज्युनिअर इंजिनिअर सागर साळवे यांनी आपल्या लग्नसोहळात लग्न लागण्या अगोदर मंगल कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले व नंतर लग्न विधी सोहळा संपन्न झाला.
सागर साळवे यांचा विवाह विटावे ता.चांदवड येथील प्रगतशील शेतकरी श्री.उमेश वाल्मिक आहिरे यांची कन्या अश्विनी यांच्याशी, समर्थ लॉन्स निमगव्हाण ता.चांदवड येथे बौद्ध पध्दतीने संपन्न झाला.
नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी सर्व थरातील मान्यवर उपस्थित होते.लग्न सोहळ्यात वृक्षारोपण करून या नवदांपत्याने “पर्यावरण जतन ही काळजी गरज आहे” असा सामाजिक संदेश देण्याचा उल्लेखनीय प्रयत्न केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here