भागवत महाराज मरकड यांची “संत ज्ञानेश्वर महाराज” पुरस्कारासाठी निवड

0

अहमदनगर (सुनिल नजन”चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ सुलतानपूर (फलकेवाडी) ता.शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील ह.भ.प. भागवत महाराज मरकड यांना लोककला, कलावंत ,साहित्यिक परीषद ,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा “संत ज्ञानेश्वर महाराज “पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी मरकड महाराज यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात असा खुलासा करण्यात आला आहे की आमच्या संस्थेच्या वतीने आपली “संत ज्ञानेश्वर महाराज ” या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. आपण अनेक वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक,परमार्थीक जनजागृती विषयक कार्याची दखल घेऊन आपणास हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.आपणास पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख,वार,वेळ, ठिकाण यथावकाश कळविण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष पवार साहेब यांनी मरकड महाराज यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.आणि पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. ह.भ.प.मरकड महाराज हे अनेक वर्षांपासून भजन,किर्तन,पखवाज वादक म्हणून परमार्थीक सेवा करीत आहेत. त्यांचा संपूर्ण राज्यभर चांगला मोठा जनसंपर्क आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे अमरापूर पंचक्रोशीत त्यांचं मोठं कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here