तुका म्हणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची

0

पोलादपूर प्रतिनिधी ( शैलेश सणस ) १९४० च्या दशकात वडघर या गावी अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला आलेले चंदरशेठ जन्मताच एक दोन वर्षाच्या कालावधीतच वडिलांच निधन झाल्याने आई रुखमीणीबाई यांच्या कुशीत गोर गोरगरिबांचा चंदरशेठ वाढत होता घरातील आर्थिक स्थिती प्रतिकूल नसल्याने,चंदरशेठ (चंद्रकांत लक्ष्मण कदम ) नावाचा हा पोलादी पुरुष आई रुखमीणीबाई यांच्या सुसंस्कृत संस्कारा मध्ये हळूहळू मोठा होत होता.जेमतेम वयात आल्यानंतर आईच्या डोक्यावरच संसार रुपी वज्याला चंदरशेठ हातभार लावू लागले आपल्या आईला मदत करत असतानाच त्यांच्या अंतर मनातल्या भावना काही शांत बसू देईनात कुठलीच कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांच्या स्वःकर्तुत्वावर १९६० किंवा १९६५ च्या दरम्यान ते आचनक राजकारणात ओढले गेले आणि १९६६ च्या दशकामध्ये नुकतीच महाराष्ट्रा मध्ये हिंदुत्व आणि मराठीची आग ओखनार्या आताच्या शिवसेनेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यानी जन्म दिला होता,
स्वभावाने शांत असणारे चंदरशेठ शिवसेने कडे आकर्षित झाले व पक्षात सहक्रीय होत गेले, त्यांच्या त्या काळच्या सहकार्याान सोबत या कामथी विभागामध्ये शिवसेनेचा विस्तार करत राहिले;
आणि म्हणतात ना ..! संयम व शांतता ठेवली की राजकारणात कुठलीही गोष्ट अशक्य नसते अगदी तसच झाल प्रदीर्घ काळ पक्षात काम केल्या नंतर १९९५ च्या बोरघर ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाहीर झाली आणि पहिल्यांदाच शिवसेनेने निवडणूक लढविण्याचे ठरवले,गोरगरिबांचे शासकीय/निमशासकीय आर्थिक अशा अनेक अडचणी सोडविणरे *चंदरशेठ* शिवसेने कडून ग्रामपंचायत निवडणूकच्या रिंगणात उत्तरले,ग्रामपंचायतीच्या स्थापने पासून एक हाथी सत्ता असणारी कॉंग्रेस थोडी बिथरली..! आणि एक जुटिच्या जोरावर स्वर्गीय चंदरशेठ (चंद्रकांत लक्ष्मण कदम)यांच्या सहित शिवसेनेचे पॅनल मोठ्या फरकाने निवडून आले,
मग सन्माननीय माझी केंद्रीय मंत्री अनंतजी गिते,स्वर्गीय प्रभाकरभाऊ मोरे *(खर तर प्रभाकरभाऊ मोरे राज्यात गृहराज्यमंत्री असताना भाऊ स्वर्गीय चंदरशेठ याना आवडीने हाक मारून म्हणायचे चंदरशेठ आपली कृष्णा सूदाम्याची जोडी आहे तूम्ही माझे सुदामा आहात)* अशा अनेक आठवणींच्या व शिवसेनेच्या बड्या नेत्यान सोबत काम केल्याने आणि प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर स्वर्गीय चंदरशेठ यांच्या गळ्यात कामथी विभागातला शिवसेनेचा पहिला *सरपंच* बनण्याचा बहुमान मिळविला,तदनंतर माननीय *आमदार श्री भरतशेठ गोगावले* यांच्याशी मधुर आणि स्नेहाचे कौटुंबिक समंध असल्याने विभागातील आनेक विकास कामांना गती देत आपल्या सरपंच पदाला न्याय दिला,
असे गतिशील आणि प्रगतीशील *चंदरशेठ* आपल्यातून या जगाचा निरोप घेऊन स्वर्गलोकी गेले….! !
आज चंदरशेठ यांच्या पाश्च्यात पत्नी ३ मूळ १ मुलगी त्यांचा मोठा मुलगा कृष्णादादा कदम (K.K.) हे शिवसेनेच्या पोलादपूर तालुका सहसंपर्क प्रमूक पदावर कार्यरत आहेत आपल्या वडिलांचा राजकीय /समाजिक वारसा जपत आहेत … देव करो या दुःखत प्रसंगातून या कुटुंबाला सावरण्याची शक्ती मिळो …पुन्हा जाता जाता
*चंदरशेठ* आपणास अखेरचा *जय महाराष्ट्र..! ! !*
💐💐भावपूर्ण श्रध्दांजली💐💐🙏🏻
🖋️संभाजी विठ्ठल पार्टे,बोरघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here