नाशिक देवळ्यात जनता कर्फ्यू’ला उस्फुर्त प्रतिसाद

0

वासोळ : वासोळ गाव ही दहा दिवस कडकडीत बंद,वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे
Mo. 9130040024,जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी देखील तालुक्यात कोरोना रुग्णाची वाढ दिसून आली. एक एप्रिल रोजी सायंकाळी प्राप्त हवालानुसार नवीन ९८ कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता तालुक्यातील कोरोना आजाराचार उपचार घेणाऱ्यांचा आकडा ९६५ वर पोहचला आहे,देवळा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देवळा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठकीत १ एप्रिल ते १० एप्रिल पर्यंत नागरिकांना जनता कर्फ्यूचं आवाहन होते. आज पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने आज देवळा शहरात सर्वत्र सन्नाटा पाहायला मिळाला.देवळा शहरासह तालुक्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्याने आज सर्वत्र शुकशुकाट दिसून आले. व्यापारी वर्गाने स्वतःहून आपली आस्थापने बंद ठेवली होती. नागरिकांनी देखील स्वत:हूनच घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसून आले. तालुक्यातील ग्रामीण भागात देखील सर्वत्र जनता कर्फ्यूला जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी देखील तालुक्यात कोरोना रुग्णाची वाढ दिसून आली. एक एप्रिल रोजी सायंकाळी प्राप्त हवालानुसार नवीन ९८ कोरोना रुग्ण आढळून आल्याने आता तालुक्यातील कोरोना आजाराचार उपचार घेणाऱ्यांचा आकडा ९६५ वर पोहचला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here