
सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे :-कोरोना ची लागण होऊन म्रुत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये लहान मुलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.तर अशीच एक घटना घडली असून सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील तीन वर्षांच्या चिमुकलीचा गुरुवार रोजी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान औरंगाबाद घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.सर्वप्रथम तिच्यावर सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.तर तब्येत जास्त खालावल्याने तिला ३१ मार्च रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.घाटिच्या बालरोग विभागाच्या प्रमुख डाॅ. प्रभा खैरे यांनी सांगितले की यि चिमुकलिला ॲनिमिया व न्युमोनिया होता.तसेच गेल्या दहा दिवसांपासून या मुलिला त्रास होत होता.खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शेवटी घाटी रुग्णालयात आणल्यावर तपासणी केली असता तेव्हा तिची टेस्ट कोरोणा पाॅजेटिव्ह निघाली.त्यानंतर आईची देखील तपासणी केल्यानंतर तिच्या आईचिही कोरोणा टेस्ट पाॅजेटिव्ह आली. तिच्या आईच्या माध्यमातून तिला कोरोणाची लागण झाली असावी.असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.लहान मुलांना ताप असल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा तसेच लहान मुलांना जास्त बाहेर फिरु देऊ नका.मास्कचा वापर करायला लावा असे आवाहन घाटी प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे…
