व्यापाऱ्यांची एंटीजन टेस्ट पालिकेने करून द्यावी व्यापारी महासंघाचे मागणी

0

मनमाड:  शहर व्यापारी महासंघातर्फे मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री मुंडे साहेबांना निवेदन देण्यात आले की मनमाड शहरातील सर्व व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांची रॅपिड एंटीजन टेस्ट ही पालिकेने त्यांच्या खर्चाने करून द्यावी . व अगोदरच कोरोना, मंदी आणि टाळेबंदीच्या त्रासाने बेजार असलेल्या व्यापारावर याचा कोणताही आर्थिक भुर्दंड टाकू नये अशी विनंती व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली. तसेच ग्राहकांच्या चुकीचा नाहक भुर्दंड व्यापाऱ्यांवर न टाकता त्याची शहानिशा करून दंड व दुकान सील करण्याची कारवाई टाळण्यात यावी असे देखील निवेदनात सांगण्यात आले. याप्रसंगी मनमाड व्यापारी महासंघातर्फे  नो मास्क नो एन्ट्री च्या पत्रकाचे प्रकाशन पालिकेचे मुख्याधिकारी श्री मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील पत्रक व्यापारी महासंघातर्फे मनमाड शहरातील प्रत्येक दुकानदाराच्या दर्शनी भागी लावण्यासाठी देण्यात येणार आहेत. या पत्रकाची स्वागतमुल्यही ठेवण्यात येणार आहे. यापुढे व्यापाऱ्यांच्या दुकाना संबंधीच्या निर्णयामध्ये व्यापारांना देखील सामील करून घ्यावे ही विनंती करण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक,सचिव राजकमल पांडे , उपाध्यक्ष सुरेश लोढा, दादा बंब, कुलदीपसिंग चोटमुरादी ,कार्यकारणी सदस्य गुरुदीपसींग कांत, केटचे कल्पेश बेदमुथा, मनोज आचलिया व प्रमोद भाबड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here