शिवा संघटनेच्या महिला आघाडी तर्फे हळदीकुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम संपन्न

0

मनमाड I प्रतिनिधी
शहर शिवा संघटनेच्या महिला आघाडी तर्फे हळदीकुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम येथील मुक्तांगण येथे संपन्न झाला.संघटनेचे शहरध्यक्ष सौ. वैशाली गुळवे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत करून शिवा संघटने विषयी माहिती मनोगतातुन व्यक्त केले. तसेच महिला पदाधिकारी सौ.सविता वाडकर यांनी आपल्या मनोगतात मकरसंक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो. त्याचप्रमाणे हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्‍या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. मकरसंक्रांत ते रथ सप्तमी या दिवसांत ठिकठिकाणी वैयक्तिक, तसेच सार्वजनिक स्तरावर हळदीकुंकू समारंभ साजरे केले जातात. असे व्यक्त केले. येवला तालुक्यातील शिवा संघटनेचे महिला आघाडीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी वैशाली गुळवे, ज्योती गोंधळे, अनिता गोंधळे,कल्पना गोंधळे,नंदिता गोंधळे,मंगल गोंधळे,सुनीता गोंधळे,आश्विनी हिंगमीरे,प्राची हिंगमीरे,नीता हिंगमीरे,सुधा लिंगायत,स्वाती सुरडे,विद्या चिनुके, अर्चना चिनुके, सविता तक्ते,नैवेद्या बिदरी,रेखा कोरपे,पूनम गोंधळे,सुप्रिया लिंगायत, ,अर्चना वाडकर, सविता वाडकर, राणी तोडकर,मनीषा होणराव, मंगल होणराव
तसेच सावरगाव महिला आघाडी शहराद्यक्ष अल्का पानमळे, उपशहराद्यक्ष आश्विनी तांदळे,सीमा पानमळे, विजया पानमळे, शोभा पानमळे आदिसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here