डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद

0

मनमाड – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनमाड येथे १२,१३फेब्रुवारी १९३८ रोजी भव्य मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद घेतली होती.त्या कामगार परिषद च्या वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे १२ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ५:००वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण, सिनियर इन्स्टिट्युट जवळ, मनमाड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या वर्धापन दिनानिमित्त मनमाड मधील सर्व संघटीत व असंघटित कामगार संघटनांना आमंत्रण देण्यात येणार आहे अशी माहिती ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन चे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड यांनी दिली.तरी मनमाड मधील सर्व संघटीत व असंघटित कामगार क्षेत्रातील सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here