दिंडोरीत डिझेल- पेट्रोलच्या वाढत्या दराविरोधात शिवसेनेचे आंदोलन

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे) वाढत्या पेट्रोल डिझेलच्या निषेधार्थ दिंडोरी तालुका शिवसेनेच्यावतीने माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,दिंडोरी येथील पंचायत समितीच्या आवारातुन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसैनिकांनी रास्तारोको आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली तहसीलदार पंकज पयार यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार धनराज महाले शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील तालुकाप्रमुख सतीश देशमुख यूवा सेना तालुकाप्रमुख किरण कावळे महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ अस्मिता जोंधळे शहरप्रमुख संतोष मुरकुटे आदींसह शिवसैनिकांनी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here