आज होणार दिंडोरी तालुक्यातील महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत-ठिकाण व वेळ बघा

0

वासोळ ( प्रतिनिधी प्रशांत गिरासे) दिंडोरी तालुक्यातील एकुण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदासाठी ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदिवासी सांस्कृतिक भवन, दिंडोरी येथे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदिप आहेर यांनी दिली.जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडील ३० जानेवारीच्या पत्रान्वये दिंडोरी तालुक्यातील महिला सरपंच पदासाठी आरक्षण निश्चितीबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. सदर निर्देशानुसार आदिवासी सांस्कृतिक भवन येथे दिंडोरी तालुक्यातील एकुण १२१ ग्रामपंचायतींच्या ५० टक्के महिला सरपंच पदासाठी आरक्षण सोडत बैठक आयोजीत केलेली आहे. दिंडोरी तालुक्यातील एकूण १२१ ग्रामपंचायत पैकी १०४ ग्रामपंचयात सरपंचपद अनुसुचित जमाती साठी राखीव असून यात ५० टक्के महिला सरपंच होतील व उर्वरित १७ ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व सर्वसाधारण यात ५० टक्के महिलांना सरपंच पदाची संधी मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here