लोहोणेर येथे वाळू तस्करांचा उच्छाद, कांदा पिकात वाळूने भरलेले ट्रँक्टर चालवत केले नुकसान

0

वासोळ(  प्रतिनिधी प्रशांत गिरासे) देवळा तालुक्यातील लोहोणेर येथे काल बुधवारी रात्री गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या उत्खनन सुरू असताना अचानक महसूल विभागाच्या भरारी पथकाचे वाहन मागे लागल्याने वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने लगतच असलेल्या शेतातील कांदा पिकांतून ट्रॅक्टर चालवत नेऊन कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून वाळू तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.लोहोणेर येथील गिरणा नदी पात्रात दि.०३ (बुधवारी) रात्री उत्खनन सुरू असताना महसुलच्या भरारी पथक वाळू तस्करांच्या पाठीमागे लागल्याने वाळूने भरलेलं ट्रॅक्टर शेजारी असलेल्या निंबा दगडु उशिरे यांच्या कांदा लागवड केलेल्या गट.न.१०५३ शेतातून भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत मोठया प्रमाणात नुकसान केले असून वाळू माफियांना उच्छाद मांडला आहे.नुकसान ग्रस्त शेतकरी निंबा उशिरे यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात यावी व वाळू तस्करांवर कायदेशीर कारवाई करण्यात यांवी अशा आशयाचे निवेदन देवळा तहसिलदार दत्तात्रय शेजुळ तसेच देवळा पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here