अवैध वाहतुकीविरुदध अचानक धाडी टाकुन अवैध गौणखनिज वाहतुक करणाऱ्या विरुदध वाहने जप्त करुन दंडात्मक कारवाई

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) मौजे शिेंदेफळ ता.सिल्लोड येथे दिनांक- 04/2/2021 रोजी रात्री 12.30 वाजता अचानक धाड टाकली असता श्री.योगेश साखरे रा बोरगाव बाजार वाहन चालक ट्रॅक्टर क्रमांक MH-20 AS-9562 व श्री बापु जावध रा.शिंदेफळ वाहन चालक ट्रॅक्टर क्रमांक विनाक्रमांक हे वाहने प्रत्येकी 1 ब्रास अवैध वाळु वाहतुक करतांना आढळुन आले. रॉयल्टीबाबत विचारणा केले असता रॉयल्टी नसल्याचे आढळुन आले. सदरील वाहने जप्त करुन तहसिल कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. संबधिताविरुदध प्रत्येकी 1,30,400/- रुपये ची दंडात्मक कारवाई प्रस्तावित केलेली आहे. सदर कारवाई स्वत: तहसिलदार सिल्लोड श्री.विक्रम राजपुत व श्री राजेश बसय्ये कोतवाल, श्री अमोल निकम,कोतवाल व श्री ज्ञानेश्वर कोरडे कोतवाल यांनी श्री ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही पुर्ण केली. तसेच तहसिल कार्यालयाने नव्याने पथक निर्माण केलेले असुन सदर पथक कार्यान्वीत केलेले असुन येणाऱ्या काळातही अवैध वाहतुकीविरुदध अचानक धाडी टाकुन अवैध गौणखनिज वाहतुक करणाऱ्या विरुदध वाहने जप्त करुन दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे श्री.विक्रम राजपुत मा.तहसिलदार सिल्लोड व श्री.ब्रिजेश पाटील, मा.उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांनी ईशारा दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here