देशाचा पोशिंदा अन्नदाता उध्वस्त होईल या हेतूनेच तीन काळे कृषी कायदे जबरदस्तीने लादले आहेत .

0

नासिक महसूल विभाग –  केंद्र शासनास आमचे म्हणणे व भूमिका कळविण्यासाठी सदरचे निवेदन सादर करीत आहोत . भारतातील कष्टकरी शेतक – यांनी कोठलाही आग्रह न धरता सुध्दा केंद्र सरकारने सर्व शेतक – यांचे पतन करण्यासाठी देशाचा पोशिंदा अन्नदाता उध्वस्त होईल या हेतूनेच तीन काळे कृषी कायदे जबरदस्तीने लादले आहेत . बहुमताच्या जोरावर संसदीय लोकशाहीची पायमल्ली केली आहे . या कायद्यांमुळे शेतक – यांची आर्थिक कोंडी करण्याचे कारस्थान करुन मोजक्या भांडवलदारांचे हीत जपले जाणार आहे हे काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर लाखोंच्या संख्येने 65 दिवसांपासून शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत . सदरचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे . सत्याग्रही शेतकरी , पुरुष , महिला , वयोवृध्द यांचेवर वीज पाणी खंडीत करुन प्रचंड छळ करीत आहेत . शेतकरी आंदोलनास आम्ही बहुजन शेतकरी संघटनेमार्फत सक्रीय पाठींबा व्यक्त करण्यासाठी आज गुरुवार दि .04.02.2021 रोजी शेतक – यांनी प्रचंड संख्येने येवून आपल्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले . यापुढे मोठे आंदोलन करण्यात येईल . त्याची जबाबदारी केंद्र शासनाची राहील . याची मे.शासनाने दखल घ्यावी . या काळया कायद्यामुळे होणारे गंभीर परिणाम – 01 ) आपल्याच शेतात मालक असलेला शेतकरी मजूर बनणार 02 ) कायदा भांडवलदारांच्या हितासाठी पण नुकसान झाले तर शेतक – यांचे 03 ) शेतक – यांचा माल हमीभावापेक्षा कमी दरात घेणार नाही अशी तरतूद कायद्यात नाही . 04 ) जमिनीचा ताबा आणि जमिनीवरचे अधिकार शेतक – याकडे राहणार नाही . 05 ) करार झाल्यानंतर करार केलेल्या कंपनीशिवाय इतरांना माल विकता येणार नाही . 06 ) नाशवंत माल साठवणूकीस आतापर्यंत मर्यादा होत्या त्या उठवल्यामुळे कार्पोरेट कंपन्या प्रचंड मोठे गोडावून बनवून हा माल प्रिझर्व्ह करुन ग्राहकांची लूट केली जाईल . 07 ) अदानींनी हे कायदे येण्याआधीच सेटअप रेडी केला आहे . 08 ) कराराच्या अटीशर्तीचा भंग झाल्यास न्यायालयात जाता येणार नाही . 09 ) स्वामिनाथन आयोग लागू करा . 10 ) एम.एस.पी.आधारभूत किंमतीचा कायदा करा . हा शेतक – यांचा विश्वासघात आहे . आम्ही सहया करणार बहुजन शेतकरी संघटनेमार्फत हे निवेदन सादर करीत आहोत . अशोकराव खालकर, दत्ताजी गायकवाड, निवृत्तीराव अरिंगळे, भाऊसाहेब अरिंगळे ,सुदाम बोराडे तुकाराम पेखळे, गोराखनाथ बलकवडे शिवाजी करंजकर भास्कर गोडसे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here