परीक्षेचा बाऊ करू नका- विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर

0

( दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे दहावीच्या विध्यार्थ्यांना मार्गदर्शन ) वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- विद्यार्थ्यांनी अधिकाधिक परीक्षेचा सराव करावा, पाठांतर टाळून समज पूर्वक वाचन करावे,परिक्षेचा बाऊ करू नका असा सल्ला दिंडोरी पंचायत समितीचे विशेष तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी दिला.दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव तालुका दिंडोरी येथील जनता सेवा मंडळाचे माध्यमिक विद्यालयात दिंडोरी पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना क्षीरसागर बोलत होते.यावेळी विस्तार अधिकारी वंदना चव्हाण, केंद्रप्रमुख मीरा खोसे,विद्यालयाचे प्राचार्य मधुकर आहेर,दत्तात्रय निकम, दिनेश देवरे,त्र्यंबक कदम,राजेन्द्र देशमुख, अरुंधती पाटील,वैशाली निकम,हेमंत बागुल आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दिनेश देवरे यांनी केले.विद्यालयाचे प्राचार्य मधुकर आहेर यांचे हस्ते ज्ञानेश्वर क्षीरसागर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आभार त्र्यंबक कदम यांनी मानले.पुढे बोलतांना क्षीरसागर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी परीक्षेचे तंत्र व मंत्र याविषयी सखोल मार्गदर्शन केले.समोर परीक्षेचे ध्येय ठेऊन अध्ययनाचे टप्पे केले तर ते सहज साध्य करता येतात.दुसऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे बाळगून दडपण घेऊ नका,त्यामुळे मनावर ताण निर्माण होतो,त्याचा विपरीत परिणाम अध्ययनावर होतो.पेपर सोडवताना सुवाच्य लेखन,नीटनेटकेपणा,मुद्देसूद पेपर मध्ये लेखन असावे असा सल्ला क्षीरसागर यांनी दिला.तसेच परीक्षेला सामोरे जाताना योगाचे अनुसरण केल्यास त्याचा अधिक लाभ होतो,सक्षमपने तयारी करता येते असे क्षीरसागर यांनी नमूद केले.परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब टाळून,तयारी करून आत्मविश्वास पूर्वक सामोरे जावे व यश संपादन करावे असा मौलिक सल्ला त्यांनी दिला.नव्या राष्ट्रिय शैक्षणिक धोरणानुसार यापुढे दहावी साठी बोर्ड परीक्षा नसणार आहे. दहावी नंतर आपल्या क्षमतेनुसार आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे असे क्षीरसागर यांनी नमूद केले.विविध क्षेत्रात संधी उपलब्ध असून त्यासाठी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची शाखा निवडावी,स्वयं रोजगार निर्माण करण्यासाठी तयार व्हावे असे क्षीरसागर यांनी नमूद केले. भारत हा जगात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा देश असून भारतात कुशल मनुष्यबळाचा अभाव असल्याचे क्षीरसागर यांनी नमुद केले.व्यवसायाचे कौशल्य, संभाषण कला,व्यक्तिमत्व या बाबींना औद्योगिक क्षेत्रात महत्व असून या बाबी आत्मसात कराव्यात असे क्षीरसागर यांनी नमूद केले.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here