
सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील बस स्थानक परिसरामध्ये असलेल्या आदिनाथ कृषी सेवा केंद्र या दुकानात चोरट्यांनी शुक्रवार दिनांक 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या चोरीमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांच्या कृषी साहित्याची चोरी केली असल्याची तक्रार कृषी केंद्र चालक राहुल पाटील यांनी केली आहे रासायनिक खते बियाणे व औषधी चे साहित्य विक्री करण्याच्या या दुकानात शुक्रवार दिनांक 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर चे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला व महागडी औषधे चे साहित्य असा एकूण अंदाजे अडीच लाख रुपयांचे कृषी औषधी चोरून नेले शनिवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली दुकानाचे मालक राहुल पाटणी यांनी तात्काळ पोलिसांना या विषयी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बिडवे पोलीस अधिकारी राहुल नेहुल यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला अधिक तपास लावण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते मात्र ही बस स्थानकाच्या आवारातच घुटमळले त्यामुळे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास उपनिरीक्षक विकास आणि जमादार रंगराव बावस्कर सचिन सोनार हे करीत आहे
