मराठीभाषेत बोलण्यासाठी प्रत्येकाने आग्रही असावे – कवी प्रदीप गुजराथी

0

मनमाड :- मराठी भाषा ही ज्ञानभाषा असून तिला संतपरंपरेचा समृद्ध वारसा असल्याने विद्यार्थ्यांनी आवर्जून मायबोलीतूनच आपले विचार, भावना व्यक्त कराव्यात असे प्रतिपादन कवी प्रदीप गुजराथी यांनी केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त मनमाड येथील म. गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व मराठी विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.या प्रसंगी प्रदीप गुजराथी यांनी दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचे महत्व विषद केले. त्यांनी आपल्या रसरसीत कविता, खुशखुशीत वात्रटिका व विनोदाची पेरणी करत विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्व पटवून दिले.अध्यक्षस्थानी ज्यु. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. ज्योती बोडके – पालवे होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्रा. बोडके – पालवे यांनी मराठी भाषेचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे सांगितले.कार्यक्रम आधिकारी प्रा. डाॕ. पी. बी. परदेशी यांनी प्रास्तविक केले. प्रा. घुगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. कातकडे यांनी आभार मानले.कार्यक्रमास प्राचार्य डाॕ. बी. एस. जगदाळे, मराठी विभागप्रमुख उपप्राचार्य डाॕ. पी. जी. आंबेकर, प्रा.डाॕ. व्हि. टी थोरात, प्रा. एन. ए. पाटील, प्रा. वर्षारानी पेडेकर , प्रा. ठाकोर व प्राध्यापक वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे , कविता, अभिनय इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here