सिटीझन वेलफेअर असोशिएशनची स्थापना,बदलापुर गृहनिर्माण सोसायटी महासंघात सामिल व्हा.

0

बदलापुर- (गुरुनाथ तिरपणकर)-मी बदलापुरकर या घोषवाक्याने शहरातील नागरीकांसाठी सुरु झालेली चळवळ “सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या”स्थापनेने पुर्ण झालेली आहे.धर्मादाय आयुक्त कार्यालय,महाराष्ट्र शासन नोंदणी क्र.महा/७२/२०२१यान्वये २५जानेवारी २०२१रोजी नोंदणी झालेली आहे.या असोसिएशनच्या माध्यमातून बदलापुर येथील गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे,बदलापुर शहर आदर्श शहर व्हावे,बदलापुर शहरातील पाच हजार गृहनिर्माण सहकारी संस्थांनमध्ये सौदार्यपुर्ण-कौटुंबिक जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे, संस्थांचे व फ्लॅट धारकांचे वादविवाद सामोपचाराने सोडविणे,इमारतींचे कन्व्हेन्स डिल करण्यासाठी संस्थांना मार्गदर्शन करणे,जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या सहकारी धोरणानुसार सोसायट्या व फ्लॅट धारकांना सहकार्य, मार्गदर्शन, प्रशिक्षण आयोजित करणे,सोसायट्यांचे लेखापरिक्षण होण्यासाठी सहकार्य करणे,शहरातील नागरीकांसाठी नगरपरिषदेतर्फे सिटीस्कॅन,एमआरआयसह मल्टीस्पॅशॅलिटी ॠग्णालय होण्यासाठी प्रयत्न करणे,बदलापुर शहराचा विकास आराखडा मंजुर प्लॅननुसार होईल याकडे लक्ष देणे, हाच विकास आराखडा सर्व जनतेच्या माहितीसाठी नगरपरिषदेने चौकाचौकात लावणे,नागरीकांसाठी विकास आराखडा खुला करणे वेबसाईटवर टाकणे,बदलापुर शहरातील नागरीकांना पाणीपुरवठा, वीजपुरवठा,रस्ते,आरोग्य,स्वच्छता यासारख्या मुलभुत गरजा बदलापुरकरांना मिळाव्यात यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे,मुंबईतील बीईएसटी-तसेच खोपोली नगरपालिकेची स्वतःची बस सेवा आहे त्याच धर्तीवर बदलापुरकरांना बस सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणे,शहरातील इमारती उंचच उंच होऊ लागल्या आहेत परंतु नैसर्गिक आपत्ती किंवा इमारतीला आग लागल्यास जिवित व मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी बदलापुर नगरपरिषदेची स्वतःची अग्निशमन यंत्रणा अद्यायावत करण्यासाठी प्रयत्न करणे,कायदा व सुव्यवस्था अबाधित व शहर शांततामय रहाण्यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करणे अशा अनेक समस्यांचे निराकरण आपल्या सर्वांच्या मदतीने “सिटीझन वेलफेअर असोशिएशनच्या”माध्यमातून करावयाचे आहे.त्यामुळे असोसिएशनचे सदस्य व्हा.या बदलापुर गृहनिर्माण सोसायटी महासंघात सामिल व्हा,असे आवाहन जेष्ठ सल्लागार दिलिप नारकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे अध्यक्ष सुनिल दळवी-९३२०६५०६९२,सचिव राजेंद्र नरसाळे-९७३०२२१२७७कोषाध्यक्ष राजाराम रासकर-८२०८३५४४२६यांच्याशीसंपर्क,साधावा.धन्यवाद,महेश्वर भिकाजी तेटांबे,पत्रकार, ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here