सिल्लोड तालुक्यातील🌹 वंचित बहुजन आघाडी🌹चे नवनिर्वाचित ग्राम संसद सदस्य यांना मा.बाळासाहेबांनी दिल्या शुभेच्छा..

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिरे) सिल्लोड तालुक्यामध्ये माननीय श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी ने तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतीमध्ये उमेदवार उभे केले होते एकूण उभ्या केलेल्या १६ उमेदवारांपैकी १२ उमेदवार मोठ्या फरकाने विजय झाले तर बाकी उमेदवार थोड्याफार फरकाने पराभुत झाले परंतु पराभूत झालेले उमेदवार हेदेखील विजय झाल्याचे आम्हाला वाटत आहे, या वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो , माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या जिल्हा भरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी च्या ताब्यात आल्या. सिल्लोड तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंच पदाचे ही दावेदार आहेत,. येणाऱ्या आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणा च्या माध्यमातून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार यात मात्र शंका नाही- आपला.शालिक शेळके. वंचित बहुजन आघाडी . तालुका अध्यक्ष,सिल्लोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here