सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया, ची यशस्वी घोडदौड.

0

मुंबई – सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया, ही सामाजिक संस्था जनसामान्य व्यक्तींच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारी तसेच जनतेच्या मूलभूत अधिकारांसाठी सतत कार्यरत असते. संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष श्री. संजय वासुदेव पवार हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात बरीच वर्षे जनतेची सेवा करत असून त्यांच्याच कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम सध्याच्या अध्यक्षा कु. शितल शिवाजीराव मोरे आणि सरचिटणीस अभिजीत दिलीप सांगळे करत आहेत. सांस्कृतिक, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि बालकल्याण विभाग. अशा विविध क्षेत्रांत संस्था कार्यरत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी वर देखिल यां संस्थेने आपले कार्य निरंतर चालू ठेवले आहे. सततच्या लॉकडाऊन काळात संस्थे मार्फत अन्न धान्य वाटप, २५००० प्रवसी मजदूरांना मोफत पाणी आणि जेवणाचे पाकीट वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे सॅनिटाईझर आणि मास्कचे वाटप सुद्धा करण्यात आले. इतकंच नव्हे तर युवा बेरोजगाराना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी, तसेच स्वतःचा असा उद्योग सुरू करण्यासाठी सर्व क्षेत्रातील प्रोफेशनल लोकांची ड्रीम टीम बनवून संपूर्ण महाराष्ट्रात आपली वृक्षवेल वाढवत आहेत. यां उपक्रमांतर्गत सांस्कृतिक विभागाचा पूर्ण कार्यभार हा सरचिटणीस श्री. दिपक सावंत आणि उपाध्यक्ष श्री. प्रशांत अनगुडे पाहत असून संस्थेच्या ध्येयापोटी समाजातील विविध स्तरातील लोकाना आणि नवोदित कलाकारांना एकत्रित आणून सामजिक उपक्रम राबविणे, देशातील विविध घटक व घटनांचा आढावा घेणे हे एकमेव उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी सत्यमेव जयते ट्रस्ट इंडिया, महाराष्ट्र कार्यकरणीचे अध्यक्ष रंगराव घागरे, उपाध्यक्ष अमित ठुबे व सौ. सुमन पाटील, सचिव प्रशांत पाटील, आयटी सेल उपाध्यक्ष ऋषिकेश किशोर महाजन आदी कार्यकर्ते सतत कार्यरत असतात.धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here