अंबरनाथमध्ये ख्रिश्चन बांधवांचा वंचितमध्ये प्रवेश

0

अंबरनाथ – अंबरनाथ येथील बेथसदा चर्चचे पास्टर मोसेज यांनी आपल्या शेकडो ख्रिश्चन बांधवांसह वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराचे पूर्व व पश्चिम शहर अध्यक्ष प्रवीण गोसावी व नितीन इन्कर व अंबरनाथ समन्वयक हरीश गुप्ता यांच्या माध्यमातून ठाणे जिल्हा अध्यक्ष माननीय सुनील भगत साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी पास्टर मोसेज यांनी अल्पसंख्यांक समूहाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्तेचा वाटा देणार अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी सुनील भगत साहेब यांनी वंचित बहुजन आघाडी सर्व जाती समूहाला सोबत घेऊन काम करीत असून यापुढे सुद्धा पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही दिली.यावेळी उल्हासनगर शहर अध्यक्ष शेषराव वाघमारे या कार्यक्रमाला अंकुश बचुटे, मधुकर साखरे,अविनाश गाडे , अशोक सुर्यवंशी, संतोष कुऱ्हाडे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here