आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मध्य रेल्वे महाप्रबंधक (जनरल मॅनेजर) व डिव्हीजनल मॅनेजर यांची भेट घेऊन नांदगाव तालुक्यातील रेल्वे समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा करुन निवेदन दिले.

0

मनमाड – मनमाड रेल्वे स्टेशनवर रेल्वे महाप्रबंधक (जनरल मॅनेजर) यांची स्टेशन इन्स्पेक्शन साठी मनमाडला आले असता तालुक्यातील रेल्वे समस्यांविषयी झालेल्या आंदोलनामुळे आमदार साहेबांशी घेतलेल्या बैठकीप्रसंगी विविध प्रश्नांवर प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी जनरल मॅनेजर (GM) डिव्हीजनल मॅनेजर (DRM) व रेल्वेचे उच्च अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनमाडची जीवनवाहिनी असलेली गोदावरी एक्सप्रेस व मनमाड – इगतपुरी शटल लवकर सुरु करणे, मनमाड रेल्वे स्टेशन हद्दीतील रिक्षा- टैक्सी स्टैंड हे स्टेशन बाहेर न काढता मोजक्या संख्येने रिक्षा व टैक्सी स्टेशन परिसरात स्टैंड देणे, नांदगावला काशी एक्सप्रेस, कामायनी एक्सप्रेस, महानगरी एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, जनता एक्सप्रेस यांचे थांबे मिळावे व रेल्वे स्टेशनशी संबंधित इतरही समस्यांवर चर्चा केली. तालुक्यातील या दोन महत्त्वाच्या स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने विशेष लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली. त्यास जनरल मॅनेजर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्टेशन बाहेरील स्टैंड मोजक्या संख्येने स्टैंड मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले व इतरही मागण्यांचा सकारात्मक विचार करुन लवकरच निर्णय घेण्याविषयी आमदार साहेबांना आश्वासित केले. सुमारे अर्ध्या तासाच्या चर्चेतून रेल्वेचे चांगले निर्णय होण्याची अपेक्षा यामुळे व्यक्त झाल्या.या चर्चेप्रसंगी जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हाउपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख तथा नगरसेवक मयुर बोरसे, ग्राहक संरक्षण कक्ष अध्यक्ष योगेश इमले, मुन्ना दरगुडे, सचिन दरगुडे, रिपाई चे रवीभाऊ खैरनार, अजिंक्य साळी प्रवासी संघटनाचे नरेंद्र खैरे, संदीप व्यवहारे, टैक्सी – रिक्षा युनियनचे बाळा भोसले, विलास मोरे, रामा शेजवळ, कैलास पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here