किंगस्टार स्पोर्ट्स अकॅडमीे आयोजीत दिएगो मेरोडना फुटबॉल चॅम्पियन चषक २०२० संपन्न..

0

अहमदाबाद – अहमदाबाद किंगस्टार स्पोर्ट्स ग्राऊंड
अहमदाबाद येथे नुकतेच 7A साईड फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती. १५ ते १७ वयोगटातील
या टुर्नामेंट मध्ये अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि वडोदरा येथून जवळजवळ १२ संघांनी सहभाग दर्शवला.
यामध्ये मुंबईची फूटी फर्स्ट टीम आणि कॉसमॉसच्या फुटबॉल संघात अंतिम सामना झाला. संपुर्ण स्पर्धेत फूटी फर्स्टच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. आणि गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कॉसमॉस संघाचा गोलरक्षक मानस याने तो गोल रोखला आणि संघाला पराभवापासून वाचवून पेनल्टी शूटआऊटसाठी नेले आणि कॉसमॉस संघाने पेनल्टी शूटमध्ये फूटी फर्स्ट संघाचा पराभव केला. प्रशिक्षक तुषार सर आणि चौहान सर यांनी आपल्या संघाला चांगले प्रशिक्षण दिले जेणेकरुन फूटी फर्स्ट संघाने अंतिम फेरी गाठली. कॉसमॉस टीम अहमदाबादचे प्रशिक्षक मयूर आणि गोल्डी सायनी यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि कॉसमॉस संघ अंतिम विजेता ठरला. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर मानस, उत्कृष्ट खेळाडू ब्रिज शहा आणि संपुर्ण संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणुन क्रिश चौहान यांना गौरविण्यात आले. क्रिश संपूर्ण स्पर्धेत एक अतिशय लोकप्रिय खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. उपस्थित मान्यवरांनी त्याचे खुप कौतुक केले आणि तो पुढे जाऊन भारतीय संघाकडून खेळू शकेल, अशी ग्वाही दिली. किंग स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे हितेंद्र वाघेला म्हणाले की आम्ही जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मेरोडनाच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजीत केली. त्यामुळे आम्हाला त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आम्हाला मुंबईतील फूटी फर्स्ट टीमचे प्रशिक्षक चौहान सर आणि टूर्नामेंटच्या सर्व सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.महेश्वर भिकाजी तेटांबे (पत्रकार) ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here