M.M.R.D.A ने कुळगांव-बदलापुरसाठी मंजुर झालेला विकास आराखडा जनतेसाठी खुला करा,तसेच खाजगी करणातुन डायग्नोस्टीक सेंटर सुरू करा.सहकारी गृहनिर्माण संस्थांचा महासंघ पाठपुरावा करणार

0

मुंबई – बदलापुर(गुरुनाथ तिरपणकर)-शहरातील लोकसंख्या चार लाखांच्या आसपास आहे.बदलापुर शहरातील तमाम सर्व नागरिकांनी सहकारी गृहनिर्माण महासंघाच्या अधिपत्याखाली एकत्र येण गरजेच आहे.ब-याच नागरी सुविधा नगरपरिषदेशी निगडीत आहेत.विविध प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.त्याच अनुषंगाने M.M.R.D.A यांनी मंजुर कलेला विकास आराखडा प्लान सहीत नगरपरिषदेने जनहीतार्थ सर्व नागरिकांसाठी खुला करावा.विकास आराखड्यासंदर्भातील चौका चौकात फलक लावावेत.तसेच जनतेला कल्याण-डोंबिवली, ठाणे,मुंबई याठिकाणी उपचारासाठी जावे लागते,लोकसंख्येनुसार बदलापुरात सुसज्ज हाॅस्पिटल नाही.त्याकरिता महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधुन नगरपरिषदेच्या पुढाकाराने खाजगी करणाच्या माध्यमातून डायग्नोस्टीक सेंटर सुरू करण्याची मागणी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने केलेली आहे.महासंघाच्या पदाधिकारी व कोअर कमिटी सदस्यांनी या विविध नागरी सुविधा संदर्भात नगरपालिकेला ई मेलद्वारे निवेदने पाठविण्यात आलेली आहेत.बदलापुर शहर हे सुज्ञ,सजग,सुशिक्षित नागरीकांचे शहर आहे. आपल्या विविध नागरी सुविधा संदर्भातील मागण्या नगरपरिषदेकडे ई मेल द्वारे पाठविणे आपले कर्तव्य आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे पदाधिकारी प्रत्यक्ष भेटुन विचारविनीमय करतीलच.याकरिता समस्त बदलापुरकर नागरीकांनी उत्स्फूर्तपणे Email:kbmc123@gmail.com या ई मेल आयडीवर आपल्या नागरी सुविधा संदर्भातील स्वतःच्या नावाने निवेदन पाठवावे.अशी विनंती जेष्ठ बदलापुरकर,महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक व मुख्य निमंत्रक बाळासाहेब सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here