शासनाच्या आदेशानुसार मुर्डेश्वर महादेव मंदीर येथे सोशल डिस्टंन्सिंग नियमाप्रमाणे दर्शन सुरू

0

सिल्लोड ( प्रतिनिधी – विनोद हिंगमिरे) कोरोना महामारी च्या काळात महाराष्ट्रभरातील मंदिर मशीद चर्च पूर्णपणे बंद होती ती राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार खुली झाली आहेत. भाविक मंदिरात जाऊन सोशल डिस्टन्सिंग प्रमाणे दर्शन घेत आहे. भाविकांच्या चेहऱ्यावर भगवंताचे दर्शन केल्यानंतर आनंद उत्साह दिसत आहे.
कोरोणा महामारी च्या काळामध्ये मागील आठ महिन्यापासून महाराष्ट्रातील मंदिर, मशीद आणि चर्च पूर्णपणे बंद होती.त्यामुळे मंदिर परिसरात विक्री करणाऱ्या छोट्या -छोट्या दुकानदारावर उपासमारीची वेळ आली होती. भक्तांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता परंतु नुकतेच राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सर्वच धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली झाली आहेत.असेच काही श्री.क्षेत्र मुर्डेश्वर मंदिर या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतांना दिसून येत आहे. दर्शन केल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त होतांना दिसत होता. मंदिरे खुली केल्यामुळे सर्व व्यापारी वर्गामधून आनंद व्यक्त होत आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्णयाच स्वागत भाविक भक्त व छोट्या-मोठ्या व्यापारी वर्गातून होत आहे.दिवाळीची ही भेटच राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे आम्ही राज्यशासनाचे आभार व्यक्त करत असल्याच नारळ पानफूल अगरबत्ती विकनारे व भाविकांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here