अनेक गावांमध्ये  प्रत्येक आठवड्याला एकदा अवैध पद्धतीने टांग्यांच्या शर्यतींचे आयोजन राजरोसपणे सुरू

0

सिल्लोड ( प्रतिनिधी विनोद हिंगमिर) बोरगांव बाजार व भराडी परिसरात भरवल्या जातात जिवघेण्या अवैध बैल-घोडा टांग्याच्या शर्यतीत व या मुक्याप्राणी व नागरिकांच्या जीवांशी खेळ रासरोज चालु संबधीत घेत आहे बघ्याची भुमिका,राज्य शासनाने बैल-घोडा टांगा शर्यतीवर बंदी घातली असताना सुध्दा सिल्लोड तालुक्यामध्ये बोरगाव बाजार,भराडीसह अनेक गावांमध्ये  प्रत्येक आठवड्याला एकदा अशा अवैध पद्धतीने टांग्यांच्या शर्यतींचे आयोजन राजरोसपणे सुरू आहे, बोरगांव बाजार परिसरात प्रत्येक आठवड्यातुन एकदा सकाळी सहा वाजता भराडी ते आडगाव फाट्यापर्यंत या बारा किमी मिटर अंतराच्या एक घोडा एक बैल जुंपलेले अनेक टांगे व सोबत मद्यमध्ये धुंद असलेले शेकडो मोटारसायकली त्यामुळे कन्नड सिल्लोड हायवेवर वाहनांची गर्दीच गर्दी झालेली दिसुन येते,या जीव घेण्या शर्यतीमध्ये अनेक बैल जखमी होतात व आपले प्राण गमावतात,अनेकजण शर्यत जिंकण्यासाठी बैलांना मादक द्रव्य पाजली जातात,तसेच अतिशय क्रूरपणे चाबकाचे आसूड,आरुची(टोकदार)काठी व वारंवार टोचले जाणारे आरु यामुळे जनावरे रक्तबंबाळ  होतात व त्यामुळे आजपर्यंत कित्येक जनावरांनी थकून-भागून आपला जीव सोडला आहे,याशर्यती दरम्यान (खाटीक) कसायांपेक्षा अधिक अवहेलना मुक्या प्राण्याची चालू असते,यामध्ये काही टांगे बेलगाम होऊन मूळ रस्ता सोडतात व रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन व लोकांवर व वाहनांवर हे टांगे चढतात यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारे महिला व नागरिक भयभीत होतात,दोन वर्षांपूर्वी नाचनवेल येथील नागरिक कैलास महाले हे रस्त्याच्या बाजूला मोटारसायकलवर उभे असताना या अनियंत्रित पळणाऱ्या टांग्याचे आक लागून त्याचा पाय मोडला होता, तसेच बोरगाव बाजार येथील कोटनांद्रा फाटा येथील उमरिया यांच्या घराजवळ उभ्या असणाऱ्या मोटारसायकलवर नियंत्रण सुटलेला टांगा चढला होता यामध्ये त्यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले परंतु टांग्यावाल्यांनी उलट त्यांच्याशीच अरेरावी केली,एवढे सर्व अनेक वर्षापासून सुरू असताना प्रशासनाला हे दिसत नाही का असा प्रश्न नागरिकांतुन उपस्थित केला जात आहे.पुढील शर्यतीचे आयोजन केव्हा आहे याची माहीती नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने माहिती दिली आहे की पुढील शर्यत ही 25 नोव्हेंबरपर्यंत सकाळी केव्हाही होणार आहे. याची माहिती बोरगाव बाजार व बोरगाव वाडी येथील पोलीस पाटील नंदु बेडवाल यांची सुचना सिल्लोड ग्रामिण पोलीसांपर्यंत भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे,बोरगाव बाजार येथील काही तरुणांनी या शर्यती थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर वाद ओढवला होता यानंतर शर्यती आम्ही बोरगाव येथून होऊ देणार नसल्याचे बोरगावच्या तरुणांनी सांगितले आहे,तरी संबधीत प्रशासनाने या प्रकारनाकडे जातीने लक्ष घालून अशा शर्यतींचे आयोजन एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी थांबवावे अशी मागणी नागरिकांतुन होत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here