सावळदबारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतचे काम अंधारात व निकृष्ट दर्जाचे .

0

सिल्लोड (प्रतिनिधी -विनोद हिंगमिरे ) सावळदबारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतचे काम निकृष्ट दर्जाचे चालू असून ते काम दिवसांना करून अंधारात करतात प्रशासनाचे ही दुर्लक्ष. संबंधित ठेकेदार कॉन्ट्रॅक्टदार यांची चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्याबाबत. समस्त गावकरी व परिसरातील नागरिक यांनी लेखी निवेदन सादर करून प्रथम ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी बिडकर यांना देऊन नंतर गटविकास सोयगाव यांच्या कडे केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सावळदबारा अंतर्गत १४ खेडे गावांचा समावेश असलेल्या आरोग्यकेंद्र शासनाने २०१८ मध्ये शासनाने नवीन इमारतीचे मंजुरी देऊन अंदाजे पाच कोटी साठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला. ते बांधकाम २०१९ मध्ये चालू करण्यात आले. सदरील ते काम निकृष्ट दर्जाचे असून संबंधित ठेकेदार यांनी माती मिस्त्रीत रेती, बोगस कच्ची खडी व सिमेंट ही कमी प्रमाणात वापरून काम बोगस व निकृष्ठ दर्जाचे चालू असल्याचे सावळदबारा परिसरातील नागरिकांनी दि. 19 नोव्हे. बुधवार रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी, इंजिनीयर यांना काम पाहण्यासाठी वेळ नसल्याचे ही यावेळी नागरिकांनी सांगितले.
या अगोदर सोयगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली व काम निकृष्ट दर्जाचे चालू आहे असे त्यांना आढळून आले होते. या कामासाठी लागणारा विद्युत पुरवठा ही आरोग्य केंद्राचे विद्युत मीटर मधून वापरण्यात येत आहे. या कामासाठी पाणीसुद्धा आरोग्य केंद्राच्या बोरचे वापरण्यात येत आहे ज्या बोरचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते तेच पाणी व संबंधित कामाचा निधी फलक हे पण ठेकेदार व इंजिनियर यांनी तो फलक उलटा करून ठेवला आहे बांधकामासाठी वापरत असल्याचे . या कामासाठी प्रशासनाकडे वेळ नसल्याने तेथील सुपरवायझर यांच्या मनमानी नुसार काम चालू आहे. तरी गावकरी यांनी वारंवार सागून सुद्धा ठेकेदाराचा मनमानी कारभार चालूच आहे. तरी या कामाची लवकरच उच्च स्थरीय चौकशी करून संबधित ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत समाविष्ठ करावे तसेच तात्काळ कार्यवाही करावे असे लेखी निवेदन गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे यांच्या कडे सावळदबारा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या निवेदनावर सुनिल चोरमले, शेख रहीम, गणेश खैरे, जब्बार तडवी, सुनील माकोडे जिवन कोलते, सोनू बुढाल ताराचंद राठोड, भास्कर पाटील, ईश्वर कोलते, दिलीप पुजारी, विजय कुल्ली, शिवाजी कोते, यांच्या सह परिसरातील शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here