अल्पवयीन बालमजुराचा सर्रास वापर

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) औरंगाबाद ते जळगांव राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 753 एफ या महामार्गाच्या नुतनीकरणाच्या कामावर  16 ते 17 वय असलेल्या अल्पवयीन बालमजुराचा सर्रास वापर करण्यात येत आहे,तरी संबधीत आर.के.चव्हाण कंपनीवर बालमजुर कायदबंदी अंतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय मानवधिकार परिषद औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शेख इस्माईल यांनी कामगार उपायुक्त औरगाबाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे,औरंगाबाद ते जळगांव राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 753 एफ या महामार्गाच्या नुतनीकरणाचे काममागील दोन वर्षापासुन आर.के.चव्हाण कंपनीने घेतले आहे,व सदरिल रोडचे काम मागील दोन ते तीन वर्षापासुन चालु आहे व कामावर दररोच्या लागणाऱ्यां मजुरापैकी जवळपास या कामावर 30 टक्के मजुर बाल कामगाराचा सर्रास वापर करण्यात येत आहे,या रस्ताच्या कामावर बालमजुर वापराची संबधी ठेकेदार कंपनीला परवानगी कोण्ही दिली,नाही दिली तर मग अद्यापर्यत कार्यवाही का नाही झाली,तरी संबधीत विभागातील वरिष्ठ आधिकाऱ्यांनी औरगाबाद ते जळगाव महामार्गावर कामगाराचे हजेरी पुस्तक चेक करुन बालमजुरांची वय व ओळख पटवुन आर.के.चव्हाण कंपनीवर बालमजुर कायदाबंदी अंतर्गत याेग्यती कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय मानवधिकार परिषद औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष शेख इस्माईल यांनी विभागिय आधिकारी,कामगार उपायुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here