अभिनव प्रतिष्ठान आयोजित “पक्षी निरीक्षणात सहभागी शहरातील महिला

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :विनोद हिंगमीरे) या वर्षीपासुन महाराष्ट्र राज्यसरकार तर्फे दि.५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान हा आठवडा दरवर्षी “पक्षी सप्ताह ” म्हणून साजरा केला जाणार आहे.दि.५ नोव्हेंबर हा वन्यजीव अभ्यासक व जेष्ठ निसर्ग साहित्यिक मारोती चितमपल्ली यांचा जन्मदिन आहे व १२नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली यांचा जयंतीदिन आहे.या अनुषंगाने सरकारने व समस्त पक्षी मित्र संघटना संस्था सहयोगाने हा आठवडा राज्यभर ‘पक्षी सप्ताह ‘म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. सिल्लोड येथील पर्यावरण क्षेत्रात सातत्याने लक्षवेधी कार्य करणाऱ्या ‘अभिनव प्रतिष्ठान’ या संस्थेनेही महिलांना पक्षी जगत परिचित व्हावे ,त्यांची पर्यावरणासी नाळ घट्ट व्हावी या हेतूने शहरातील महिलांसाठी शहरालगत असलेल्या विसर्जन तलावावर दि.9 नोव्हेंबर ,सोमवार रोजी पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नगरसेविका व संस्थेच्या सदस्या अश्विनी किरण पवार यांच्या प्रेरणेने व सहयोगाने महिलांना जागतिक दर्जाच्या “ओलिंपस”या दुर्बिणीतून 40 हुन अधिक महिलांना पक्षी निरीक्षणाचा आंनद घेता आला.पावसाने तलाव तुटुंब भरला असल्याने व लॉक डाऊनचा परिणाम यामुळे येथे रोज पाखरांची शाळाच भरते. संस्थेचे डॉ .संतोष पाटील यांनी तलावावर आढळलेल्या विविध पान पक्ष्यांबद्दल माहिती दिली. शहरालगत असलेल्या या तलावावर मोठया संख्येने पक्षी व विपुल जैवविविधता निरीक्षणात आढळली.पानकोंबडी(वॉटरहेन),बदक,बगळे, वंचक (इंडियन हेरॉन),स्पूनबील म्हणजे चमचा पक्षी ,मैना,खंडया ,तुतवार, टिटवी आदी पक्षी या तलावावर मासे,खेकडे,मृदुकाय प्राणी,कीटक,शेवाळ,बेडुक,जलवनस्पती यावर उदरभरण करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.तलावाच्या मागच्या पाणथळ जागी अडीच फूट उंचीचा स्पूनबील हिवाळ्याच्या सुरुवातीलाच आला आहे.-डॉ. संतोष पाटील,अभिनव प्रतिष्ठिन उपस्थित महिलां होत्या,पक्षी निरीक्षणाचा हा शहरातील पहिलाच उपक्रम असल्याने व माझ्याही जीवनात हा क्षण मी पहिल्यांदाच अनुभवला आहे.जवळ गेले की पक्षी उडून जातात व ते बघता येत नाही ही उणीव जागतिक दर्जाच्या दुर्बिणीने व नियोजनबद्ध उपक्रमाने भरून निघाली.पक्षी व निसर्ग संवर्धन यात महिलांना या संस्थेने पुढेही सहभागी करून घ्यावे ही अपेक्षा आहे.-स्वाती चव्हाण,सिल्लोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here