विवाहीत महिलेस ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला दामिनीचा दणका…

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) येथील चंदनझिरा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका 32 वर्षीय विवाहीतेस सतत फोनवरुन ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने चांगलाच चोप दिला आहे. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी ही कारवाई केली असून तक्रार दिल्यानंतर अवघ्या 24 तासात तरुणाचा बंदोबस्त केल्याने तक्रारदार महिलेसह तीच्या कुटूंबीयांनी दामिनी पथकाचे आभार मानले आहेत.या बाबत सविस्तर असे की, जालना येथील चंदनझिरा परिसरात एक विवाहीता तिची मुलगी व आई वडिलांसह राहते. जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथील एक तरुण या विवाहीतेच्या फोनवर सतत काॅल, मेसेज करुन तिला ब्लॅक मेल करत होता. विवाहीतेच्या नातेवाईकांनाही फोन करुन तीची बदनामी करत होता. याबाबतचा तक्रार अर्ज दोन दिवसापुर्वी विवाहितेने दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव यांच्याकडे दिला होता.प्राप्त तक्रारीनुसार पल्लवी जाधव यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत मोबाईल लोकेशनच्या आधारे चापनेर, जाफराबाद येथून तरुणास ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. नंतर त्याचे दोन्ही मोबाईल फाॅरमॅट करुन यापुढे अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही असे लेखी घेऊन त्यास पुढील कारवाईसाठी जाफराबाद पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव, मपोशि एस.एम. खांडेभराड, ए.डी. साबळे, यु.पी. साबळे, आर. एल. राठोड दामिनी, पोलीस हवालदार पाटील दामिनी पथक, एएसआय सहाने पोलीस ठाणे जाफराबाद यांनी केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here