भराडी वळण रस्त्यावरील पुलाची अवस्था दयनीय सबंधीत विभागाचे दुर्लक्ष

0

सिल्लोड ( प्रतिनिधी- विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील भराडी या गावाच्या बाहेरून एक मुख्य वळण रस्ता ठेवण्यात आलेला आहे.त्या रस्त्यावरून वडोद चाथा वडाळा,बोजगाव वांगी खु या ठिकाणचे नागरिक वाहनधारक एक नेहमी ये-जा करत असतात. भराडी हे मुख्य बाजारपेठेचे गाव असून गावामध्ये व बस स्टॉप वर नेहमीची गर्दी राहत असल्याने वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून गेल्या काही वर्षापूर्वी गावाच्या बाहेरून एक वळण रस्ता काढून देण्यात आलेला आहे. आणि त्या रस्त्याने सुध्दा नेहमीच वाहनधारकांची सुद्धा वर्दळ असते.परंतु गेल्या पावसाळ्यात पुलाच्या मध्यभागी मला मोठा खड्डा पडला. असल्याने वाहनधारकांना मोठा जीव मुठीत घेऊन पुलावरून ये जा करावी लागत आहे.विशेष बाब म्हणजे या पूलाच्या बांधकाम करण्यात आलेल्या सळ्या यासुद्धा उघड्या पडल्या असल्याने पुलावरून पायी चालणे सुद्धा अवघड झाले आहे. आणि केव्हा अपघात होईल हे सांगता येत नाही वडाळा किंवा वडोद चाथा आदी ठिकाणच्या नागरिकांना सिल्लोड ला जाण्यासाठी हा वळण रस्ता सोयिस्कर पडत असल्याने नेहमीचेच या रस्त्याने वाहने जातात.परंतु संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गेल्या चार महिन्यापासून हा खड्डा तसाच पडला असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्वरित हा खड्डा बुजवण्यात यावा,व पुलावर उघड्या पडलेल्या सळ्या त्या दुरुस्त कराव्या अशी मागणी वाहनधारक यांच्याकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here